शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
4
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
5
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
6
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
9
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
10
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
11
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
13
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
14
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
15
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
16
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
17
Shyam Nath Goswami : Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
18
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
19
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
20
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई अंतर्गत प्रवेशाचा आज फैसला

By admin | Updated: May 26, 2016 00:23 IST

आर्थिक तसेच दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यांला चांगल्या प्रतिच्या शाळेमध्ये शिक्षण घेता यावे याकरिता राज्य सरकारने पाच वर्षांअगोदर ....

१ हजार ५५९ जागा : आठही तालुक्यातील जागांची सोडत निघणारवर्धा : आर्थिक तसेच दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यांला चांगल्या प्रतिच्या शाळेमध्ये शिक्षण घेता यावे याकरिता राज्य सरकारने पाच वर्षांअगोदर कायदा करून शाळेतील पटसंख्येच्या २५ टक्के जागा राखीव करण्यात आल्या. याची सोडत गुरुवारी होणार आहे.या उपक्रमांतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क राज्य शासन शिक्षण संस्थांना अदा करणार आहे. यावर्षी आरटीई अंतर्गत प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन राबविण्यात आली. यातील शेवटचा टप्पा म्हणजेच याची सोडत गुरुवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये घोषित केल्या जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.यावर्षी जिल्ह्यातील आठही तालुक्यातील नर्सरी व वर्ग १ ला करिता एक हजार ५५९ एवढ्या जागा असून याकरिता एकूण एक हजार ६७४ अर्ज प्राप्त झाले आहे. यामध्ये वर्धा- ५३४, सेलू-११४, देवळी -१८५, हिंगणघाट - ३९४, समुद्रपूर-२१, आर्वी - २२४, आष्टी ९० तर कारंजा येथून ११२ अर्ज प्राप्त झाले आहे. या सोडतीमधून पहिला वर्ग व नर्सरीकरिता एक हजार ५५९ एवढ्या जागा भरण्यात येणार आहे. यात पहिला वर्ग एक हजार ७२ तर नर्सरीच्या ४८७ मुला-मुलींना आरटीईअंतर्गत प्रवेश दिला जाणार आहे. यात समुद्रपूर तालुक्यात पहिला वर्ग ७८ तर नर्सरी ०, कारंजा घाडगे तालुक्यात पहिला वर्ग ५८ तर नर्सरी ३०, हिंगणघाट तालुक्यात पहिला वर्ग ३०१ तर नर्सरी २९, सेलू तालुक्यात पहिला वर्ग ९८ तर नर्सरी ७७, वर्धा तालुक्यात पहिला वर्ग १७३ तर नर्सरी ३१८, आर्वी तालुक्यात पहिला वर्ग १६१ तर नर्सरी ०, आष्टी तालुक्यात पहिला वर्ग ३७ तर नर्सरी २९ तर देवळी तालुक्यात पहिला वर्ग १६६ तर नर्सरी ४ जागेवर या सोडतीअंतर्गत प्रवेश दिला जाणार आहे. या होणाऱ्या सोडतीला पालकवर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.(शहर प्रतिनिधी)