विद्युत तारेच्या स्पर्शाने युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 06:00 AM2020-03-12T06:00:00+5:302020-03-12T06:00:29+5:30

नजीकच्या पढेगावसह चिकणी परिसरामध्ये सोमवारच्या मध्यरात्री वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे पढेगाव येथील मैदानावरून गेलेल्या विद्युत वाहिनीची गार्डींग तुटली. या गार्डींगला रिटर्न विद्युत प्रवाह सुरू होता. मंगळवारला धुळवड असल्यामुळे काही मुल तेथे नेहमीप्रमाणे रंग उधडत होते. दरम्यान सतीश श्रीराम दाभेकर (२७) याचा सदर विद्युत तारेला स्पर्श झाला. यात त्याचा मृत्यू झाला.

Death of a young man by the touch of an electric wire | विद्युत तारेच्या स्पर्शाने युवकाचा मृत्यू

विद्युत तारेच्या स्पर्शाने युवकाचा मृत्यू

Next
ठळक मुद्देपढेगावची घटना : धुळवडीच्या दिवशी गावात शोककळा

लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : नजीकच्या पढेगावसह चिकणी परिसरामध्ये सोमवारच्या मध्यरात्री वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे पढेगाव येथील मैदानावरून गेलेल्या विद्युत वाहिनीची गार्डींग तुटली. या गार्डींगला रिटर्न विद्युत प्रवाह सुरू होता. मंगळवारला धुळवड असल्यामुळे काही मुल तेथे नेहमीप्रमाणे रंग उधडत होते. दरम्यान सतीश श्रीराम दाभेकर (२७) याचा सदर विद्युत तारेला स्पर्श झाला. यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना १० रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली असून धुळवडीच्या दिवशीच गावात शोककळा पसरली होती.
जीवंत विद्युत तारेला सतीश चिटकल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. शिवाय सतीशला वाचविण्याचा प्रयत्न केले. यात सुमारे तीन ते चार मुलांना विद्युत प्रवाहाचा झटका बसला.
कसेबसे सतीशला विद्युत प्रवाहित तारेपासून दूर केल्यानंतर त्याला तातडीने सावंगीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. माहिती मिळताच सावंगी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळ गाठले होते. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून सतीशच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा बराच मोठ आप्त परिवार आहे.

दैव बलवत्तर म्हणून चौघे बचावले
सतीशला वाचविण्यासाठी गेलेल्या चौघांना विद्युत प्रवाहाचा चांगलाच झटका बसला. पण दैव बलवत्तर असल्यामुळे हे चौघेही थोडक्यात बचावले.

Web Title: Death of a young man by the touch of an electric wire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.