शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

कापसाच्या गंजीत दबून कामगाराचा मृत्यू

By admin | Updated: January 11, 2016 01:49 IST

जिनिंगमध्ये काम करीत असलेल्या एका मजुराचा कापसाच्या गंजीत मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना नांदगाव (बो.) येथील जिनिंगमध्ये रविवारी सकाळी उघड झाली.

विविध घटनेत तिघांचा मृत्यू : नांदगाव, आकोली व तळेगाव येथील घटना हिंगणघाट : जिनिंगमध्ये काम करीत असलेल्या एका मजुराचा कापसाच्या गंजीत मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना नांदगाव (बो.) येथील जिनिंगमध्ये रविवारी सकाळी उघड झाली. शंकर दामोधर कुकडे (२७) असे मृतकाचे नाव असल्याचे सांगण्यात आले. शंकर हा या जिनिंगमध्ये सुपरवायझर म्हणून कार्यरत होता. नित्याप्रमाणे शनिवारी तो कामावर गेला असता रविवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान मृतावस्थेत आढळून आला. याच जिनिंगमध्ये कार्यरत असलेल्या त्याच्या भावाने जिनिंगच्या गाडीने त्याला उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. असे असले तरी शंकर या गंजीवर कसा गेला, त्याच्या अंगावर कापसाचे ढिगारे कसे पडले याचा कुठलाही खुलासा झाला नाही. त्याच्या पार्थिवावर आजच गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, नांदगाव (बो.) येथील जे.आर. जिनिंग येथे शंकर कुकडे हा सुपरवायझर म्हणून कार्यरत होता. तो नित्याप्रमाणे शनिवारी रात्री जिनिंगमध्ये कामाला होता. येथे काम सुरू असताना तो कापसाच्या गंजीवर बसला असता तिथेच त्याचा डोळा लागल्याचे जिनिंगच्या परिसरात बोलले जात आहे. गारठा असल्याने त्याने आंगावर कापूस घेतला. काम सुरू असताना तो येथे असल्याकडे कुणाचेही लक्ष नसल्याने त्याच्या अंगावर कापूस टाकण्यात आला. यातच त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. आज सकाळी जेव्हा या गंजीतील कापूस खाली काढण्यात आला तेव्हा त्याखाली शंकरचा मृतदेह आढळून आला.या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. प्रकरणाचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक किशोर डफरे करीत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.(तालुका प्रतिनिधी) विवाहितेने अंगावर रॉकेल टाकून जाळून घेतलेआकोली : घरी कुणी नसताना अंगावर रॉकेल घेत महिलेने जाळून घेतल्याची घटना नजीकच्या खानापूर (कामठी) येथे शनिवारी रात्री घडली. यात महिला ९५ टक्के जळाली असून उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सोनू रवींद्र भामकर असे मृतक महिलेचे नाव आहे. पोलीस सूत्रानुसार, शनिवारी सायंकाळच्या सुमारास सोनू व तिचा पती रवींद्र भामकर हे दोघेही कामावरून घरी आले. त्यानंतर काहीच वेळात शेजाऱ्यांना सदर महिला जळत असल्याचे दिसले. त्यांनी याची माहिती खरांगणा पोलिसांना दिली. माहिती मिळताच रुग्णवाहिकेसह खरांगणा ठाणेदार प्रशांत पांडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक वसंत इंगोले, सतीश घवघवे व सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठत तिला वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. यात रात्री ८ वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यावेळी तिचा पती घरी नव्हता व त्याचा मोबाईलही बंद असल्याचे सांगण्यात आले. धामणगाव (दत्तापूर) येथील सोनुचा दोन वर्षांपूर्वी रवींद्र भामकर याच्याशी विवाह झाला होता. तिला मुलगा झाला होता. मात्र जन्मानंतर दोन महिन्यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.(वार्ताहर) सर्पदंशाने महिलेचा मृत्यूतळेगाव (श्यामजीपंत) : देवगाव शिवारात भोसले यांच्या शेतात मजुरीच्या कामाकरिता गेलेल्या महिलेला शेतात काम करीत असताना सर्पदंश झाला. परंतु याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले. तिला वेदना असह्य झाल्यानंतर हा प्रकार उघड झाला. सेवाग्राम रुग्णालयात उपचाराकरिता नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. बेबी किसन फसाटे (६०) असे मृतक महिले नाव आहे.तळेगाव येथील बेबी फसाटे या देवगाव शिवारात भोसले यांच्या शेतात कामाला गेल्या. येथे काम सुरू असताना त्यांना सर्पदंश झाला. याकडे दिवसभर दुर्लक्ष करण्यात आले होते. वेदना असह्य झाल्याने त्यांना प्रथम आर्वी व नंतर सेवाग्राम येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले. यातच त्यांचा मृत्यू झाला. कामाच्या शोधात आलेल्या मुजरांपैकी ही एक महिला असल्याचे सांगण्यात येत आहे.(वार्ताहर)