शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दिवसानुरूप लग्नाचे स्वरूप बदलले

By admin | Updated: May 18, 2014 23:50 IST

सध्या लग्नसराईला चांगलाच जोर आलाय; परंतु दिवसागणिक लग्नाचा ‘लूक’ पूर्वीपेक्षा बदलत चाललाय. प्रत्येक बाबतीत कमालिची भिन्नता दिसून येते.

 ंवर्धा : सध्या लग्नसराईला चांगलाच जोर आलाय; परंतु दिवसागणिक लग्नाचा ‘लूक’ पूर्वीपेक्षा बदलत चाललाय. प्रत्येक बाबतीत कमालिची भिन्नता दिसून येते. लग्न सोहळा म्हटला की मित्र, नातलग व गावकर्‍यांना संदेश पोहोचविण्यासाठी लग्नपत्रिका बहूतेक टपालाद्वारेच पाठवित होते. परंतु आज एका पत्रिकेला पाच-दहा रुपयांचे टिकीट लावावे लागत असल्याने केवळ लांब पल्ल्याच्या पत्रिकाच टपालाद्वारे पाठविल्या जाते. किंवा स्वत: दुचकीद्वारे, लग्नमंडपात भेटीत दिल्या जात आहे. लग्नाचे बंधन जोडले की, साखरपुडा लग्नासारखा साजरा करीत आहे. त्यातूनही अनिवार्य खर्च होताना दिसतो. लग्नसराईला जुने महत्त्व अजूनही शिल्लक आहे. यात लग्नाच्या आदल्या दिवशी नांदमुखाचा कार्यक्रम, देवकुंडी, लग्नमंडप टाकण्याची प्रथा अद्याप आहे. परंतु सध्यातरी बॅडबाजा हा कमी प्रमाणात दिसतोय. तरुणाई डीजेच्या तालावर नाचत असल्याचे चित्र आहे. पूर्वी बँडवाल्यास दोन दिवसासाठी सांगितले जायचे. गावात मिरवणूक काढून दुसर्‍या दिवशी नववधू घरी येईपर्यंत हा बँडबाजा दिसायचा. आता गावात मिरवणूकीसाठी डीजे अन् लग्नाच्या ठिकाणावर बँडबाजा दिसून येतो. विशेष बाब म्हणजे हूंडा नको ग बाई, अशी म्हणणारी वराकडील मंडळी चुप्पी साधत गुप्तपणे हूंडा घेत आहे. आज लग्नात पगंतीऐवजी बुफे पद्धत असून वर-वधू पक्षातील मंडळीकडून अन्नाची नासाडी होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)