शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

अस्वच्छतेमुळे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: October 22, 2014 23:22 IST

शहरासह परिसरातील गावात डेंग्यूने कहर केला आहे. नुकत्याच झालेल्या पाहणीमध्ये डेंग्युच्य वाढीला पोषक वातावरण असल्याचा अहवाल आरोग्य विभागाच्या पथकाने दिला आहे. डासांच्या उत्पत्तीस

पुलगाव : शहरासह परिसरातील गावात डेंग्यूने कहर केला आहे. नुकत्याच झालेल्या पाहणीमध्ये डेंग्युच्य वाढीला पोषक वातावरण असल्याचा अहवाल आरोग्य विभागाच्या पथकाने दिला आहे. डासांच्या उत्पत्तीस शहर व परिसरातील घाणीचे साम्राज्य कारणीभूत असताना स्थानिक प्रशासन मात्र डोळेझाक करीत असल्याचा प्रत्यय आर. के. कॉलनी व न्यू कुर्ला परिसरात नागरिकांना येत आहे. नाचणगाव ग्रा़ पं़ अंतर्गत येणाऱ्या या परिसरात डासांचा उद्रेक झाला असून सांडपाण्याच्या नालीचा तिढा कायम आहे. न्यु कुर्ला व आर.के. कॉलनी येथील नागरिकांनी नाचणगाव ग्रा़पं़ प्रशासनसास याबाबत निवेदन सादर केले़ या दोन कॉलनीतील सांडपाण्याच्या मुख्य नालीचा प्रश्न त्वरित निकाली काढावा, अन्यथा उपोषण करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. आर.के. कॉलनी व न्यू कुर्ला दरम्यान मुख्य सांडपाण्याची नाली आहे. मागील पाच ते सहा वर्षांपासून या नालीची कोणत्याच प्रकारची साफसफाई केली नाही. यामुळे गाळ व कचरा साचला असून सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत आहे़ ही नाली काही भागात खचल्याने चिखल होतो़ यामुळे नालीच्या काठावर राहणाऱ्यांना प्रचंड दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे़ न्यू कुर्ला परिसरातील अनेकांनी नालीवर अतिक्रमण केले आहे. यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना नालीतील कचऱ्याचा पूर्णपणे उपसा करता येत नाही. सध्या डेंग्यूने डोके वर काढले असून आजवर या आजाराचे चार बळी आहेत. या आजाराचे थैमान सुरूच असताना स्थानिक प्रशासन बेजबाबदारपणे वागत असल्याचे दिसते़ या भागातील नागरिकांनी ग्रा़पं़ प्रशासनाने अनेकदा निवेदने दिली; पण अद्याप कारवाई करण्यात आली नाही़ परिसरात डेंग्यूसदृश्य आजाराचे १० रुग्ण आढळले आहेत़ शिवाय प्रत्येक घरात किमान एक रुग्ण तापाने आजारी आहे. अशा स्थितीत नालीची स्वच्छता करून डासांच्या उत्पत्तीला प्रतिबंध घालणे गरजेचे झाले आहे. परिसरात शेणाचे ढिगारेही आहेत. यासाठी वेगळी जागा निश्चित करावी. या ढिगाऱ्यांमुळे डास वाढत आहेत़ याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी ग्रामविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे़(शहर प्रतिनिधी)