शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
3
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
4
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
6
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
7
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
8
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
9
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
10
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
11
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
13
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
14
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
15
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
16
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
17
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
18
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
19
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
20
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Daily Top 2Weekly Top 5

्रप्रेयसीच्या काका-काकूलाही संपविण्याचा होता कट

By admin | Updated: April 23, 2016 02:03 IST

लग्नाला विरोध करणाऱ्या प्रेयसीच्या आई-वडिलांना संपविल्यानंतर तिच्या काका काकूलाही संपविण्याचा कट पंकज कुसळकर याचा असल्याचे त्याने पोलिसांना दिलेल्या बयानातून उघड झाले आहे.

कारंजा येथील दुहेरी हत्याकांड : ते कुटुंब अजूनही दहशतीतच अरुण फाळके कारंजा(घा.)लग्नाला विरोध करणाऱ्या प्रेयसीच्या आई-वडिलांना संपविल्यानंतर तिच्या काका काकूलाही संपविण्याचा कट पंकज कुसळकर याचा असल्याचे त्याने पोलिसांना दिलेल्या बयानातून उघड झाले आहे. त्याच्या लग्नाला होणाऱ्या विरोधात काका व काकूची भूमिका मोठी असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून पोलिसांचा तपास सुरू आहे. हातावर आणणे आणि पानावर खाणाऱ्या या कुटुंबातील आई वडिलांचे छत गेल्याने तीनही मुलं उघड्यावर आली आहेत. या हत्याकांडानंतर त्यांच्या मनातील भय अजूनही कायमच आहे. या कुटुंबाची स्थिती अत्यंत हालाखीची असून त्यांना मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे. प्रेयसीसोबत तिचे आई वडील लग्न करून द्यायला तयार नाहीत. आता या दोघांसह विरोधात सहभागी असलेल्यांना संपविण्याचा कट पंकज कुसळकर रा. कोंढाळी याने रचला. त्याने आखलेल्या कटानुसार घटनेच्या दिवशी रात्रभर तो रस्त्याच्या कडेला एका खड्ड्यात दडून बसला होता. पहाटेची निवांत वेळ साधून तो प्रेयसीच्या घरात शिरला. सर्वच गाढ झोपेत असताना त्याने त्याच्याकडे असलेल्या धारदार शस्त्राने पांडुरंग भांडेकर व रेखा भांडेकर यांच्यावर सपासप वार केले. यावेळी भांडेकर यांच्या घरी झालेल्या आरडा ओरडाने शेजारी राहत असलेल्या अनुसया चरडे यांना जाग आली. त्यांनी मुलगा अमोल चरडेला ही घटना सांगताच अमोलने घराबाहेर पडून हत्या करून पळत असलेल्या पंकजला पकडून त्याला बांधून ठेवले. शिवाय रक्ताच्या थारोळ्यात पडून असलेल्या पांडूरंग आणि रेखा या दोघांना रुग्णालयातही नेले. भांडकेर कुटुंब मुळचे आर्वी येथील असून दगड फोडण्याचा व्यवसाय करण्यासाठी १५ वर्षांपूर्वी कारंजाला आले. त्यांना दोन मुले, व दोन मुली आहेत. त्यांचा मोठा मुलगा अण्णा भांडेकर बिड येथे बी.एस.सी. अ‍ॅग्रीकल्चर मध्ये शिकत आहे. स्वत: गाडी चालवतो आणि शिक्षण घेत आहे. लहान मुलगा रामकृष्ण खासगी वाहनावर चालक म्हणून काम करतो आहे. मुलींनाही १० वी पर्यंत शिकविल्याची माहिती या परिवारातील सदस्यांनी दिली. मोठ्या मुलीचे कोंढाळीला लग्न लावून दिले. मारेकरी हा त्याच जावयाचा लहाण भाऊ आहे. याच संबंधातून हे प्रेमप्रकरण जुळल्याचे समोर आले आहे.शिवसैनिकाचे धाडस कारंजा येथे मंगळवारी पहाटे ४ वाजता झालेल्या दुहेरी हत्यांकाडातील आरोपी पंकज कुसळकर याचा आणखी दोन खून करायचा इरादा होता. त्यासाठी तो पूर्ण तयारीनिशी आला होता; पण शेजारी राहणाऱ्या शिवसैनिक अमोल चरडे याने पंकजला मोठ्या शिताफीने आणि हिमतीने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याने पुढील दोघांचा जीव वाचला.चौघांच्या हत्येकरिता चार चाकू या प्रेमविवाहाला विरोध करणारे पे्रयसीचे आई वडील आणि काका काकू या चार जणांना संपविण्याकरिता चार नवीन चाकू आणल्याची कुबुलीही त्याने पोलिसांना दिली. ते चारही चाकू त्याने पायात लपवून ठेवले होते. ते जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पंकज बेरोजगार असल्याने विरोधभांडेकर यांच्या लहान मुलीचे पंकजसोबत प्रेमसंबध जुळले. मात्र तो काही काहीही कामधंदा करीत नसल्यामुळे आई वडील व काका-काकूचा लग्नाला विरोध होता. याच विरोधाचा काटा काढण्यासाठी पंकजने हे हत्याकांड घडवून आणल्याचे समोर आले आहे.