शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडर वितरकाची ग्रा़पं़ सदस्यास मारहाण

By admin | Updated: September 18, 2014 00:01 IST

ग्राहकांना सदोष सेवा पुरविणाऱ्या गॅस सिलिंडर वितरकाला जाब विचारणाऱ्या ग्रामपंचायत सदस्याला ग्रामस्थांसमोर गॅस एजन्सी मालकाने बेदम मारहाण केली़ ही घटना मंगळवारी रात्री ८ वाजताच्या

केळझर बंद : आरोपीस अटक करण्याची मागणीकेळझर : ग्राहकांना सदोष सेवा पुरविणाऱ्या गॅस सिलिंडर वितरकाला जाब विचारणाऱ्या ग्रामपंचायत सदस्याला ग्रामस्थांसमोर गॅस एजन्सी मालकाने बेदम मारहाण केली़ ही घटना मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. यातील आरोपीस अटक करावी, या मागणीसाठी बुधवारी दि. १७ सप्टेंबरला येथे बंद पाळण्यात आला़ यामुळे शहरातील संपूर्ण दुकाने बंद होती़ सिंदी (रे.) येथील श्री जी गॅस एजन्सीकडून केळझर येथे घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा केला जातो. गत काही वर्षांपासून गॅस ग्राहकांकडून निर्धारीत किमतीपेक्षा अधिक पैसे उकळले जात होते. सिलिंडरची घरपोच सेवा न देणे, वेळी-अवेळी सिलिंडरची गाडी पाठविणे, गॅस भरलेल्या सिलिंडरचे वजन करून न देणे आदी गैरव्यवहारांबाबत ग्रा़पं़ सदस्य सुरेंद्र ठाकरे यांनी सिंदी (रे.) येथील रितेश पालीवाल यांना जाब विचारणे सुरू केले होते. मंगळवारी गावात सिलिंडरने भरलेली गाडी आली़ यावेळी सुरेंद्र ठाकरे यांनी सिलिंडरचे वजन करून मागितले; पण गाडीत वजनकाटा नसल्याचे कर्मचाऱ्याने सांगितले़ यावरून ठाकरे यांनी एजन्सी मालकास भ्रमणध्वनीवर स्पष्टीकरण मागितले़ याचा राग धरून रितेश पालीवाल साथीदारांसह गावात आला़ ठाकरे यांच्या घरासमोर कुणाला काही कळण्यापूर्वीच ग्रामस्थांसमोर ठाकरे यांना बेदम मारहाण केली. यात मध्यस्थी करणाऱ्या ग्रामस्थांनाही त्याने मारहाण केली़ शेवटी संयम सुटलेल्या ग्रामस्थांनी आरोपी पालीवाल यास चोप देत सेलू पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी मात्र रात्री उशीरा आरोपी रितेश पालिवाल यास सोडून दिले. ग्रामस्थांनी बंद पाळून याचा निषेध नोंदविला़(वार्ताहर)