शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाला ब्रेक लावण्यासाठी कोविड चाचणी आवश्यकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क देऊरवाडा/आर्वी : उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांच्या आदेशाला आर्वीत विरोध होत असतानाच मंगळवारी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी आर्वी ...

ठळक मुद्देविवेक भिमनवार : आर्वीतील व्यापारी, खासगी डॉक्टरांशी चर्चेनंतरही तोडगा नाही

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांच्या आदेशाला आर्वीत विरोध होत असतानाच मंगळवारी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी आर्वी गाठून न.प.च्या सभागृहात व्यापारी तसेच खासगी डॉक्टरांशी चर्चा केली. व्यापारी आणि डॉक्टरांचे म्हणणे समजावून घेतल्यावर ‘कोरोनाला ब्रेक लावण्यासाठी कोविड चाचणी आवश्यक आहे, रॅपिड अ‍ॅन्टिजेन किटद्वारे करण्यात येणाऱ्या कोविड चाचणी मोहिमेला आर्वीकरांनी सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी सांगितले.आर्वीचे उपविभागीय न्याय दंडाधिकारी तथा उपविभागीय महसूल अधिकारी हरिष धार्मिक यांनी २६ जुलैला काढलेल्या आदेशाला आर्वीत विरोध दर्शविला जात आहे. सोमवारी काही खासगी डॉक्टरांनी उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. त्यानंतर आज नगरपालिकेच्या सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांनी डॉक्टरांचे प्रतिनिधी डॉ. रिपल राणे, डॉ. श्यामसुंदर भुतडा, डॉ. रोशन जवळेकर तसेच व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी हाजी सुलेमान, अनिल लालवाणी, विजय अग्रवाल, अ‍ॅड. दीपक मोटवानी, गौरव जाजु यांच्याशी चर्चा करून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. पण शाब्दिक चकमक होणार याचा अंदाज येताच कोविड चाचणी करावीच लागेल असे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी न.प. सभागृहातून काढता पाय घेतला. चर्चेत कुठलाही तोडगा न निघाल्याचा आरोप आदेशाला विरोध दर्शविणाऱ्यांकडून केला जात आहे. या बैठकीला आ. दादाराव केचे, नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा आरोग्य अधिकारी अजय डवले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी, उपविभागीय महसूल अधिकारी हरिष धार्मिक, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, तहसीलदार विद्यासागर चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता झोपाटे (हरणे), वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन सुटे, न.प. मुख्याधिकारी विद्याधर अंधारे, डॉ. रोशन जवळेकर, डॉ. दिवाकर ठोंबरे, डॉ. अभिलाश धरमठोक, डॉ. सचिन हिवसे, डॉ. उमेश गुल्हाणे आदींची उपस्थिती होती.व्यापाऱ्यांत फूट पाडण्याचा प्रयत्न - हाजी सुलेमानकोरोना टेस्ट करा आणि दुकाने उघडा असे आज जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत. मग आता संचारबंदी ३० जुलैपर्यंत लागू आहे. मग दुकाने उघडणार कशी? व्यापाऱ्यांमध्ये हा फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. कोणत्याही व्यापाऱ्याने याला बळी पडू नये, असे व्यापारी संघटनेचे हाजी सुलेमान यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या