शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

लाल्यामुळे कपाशीचे उत्पादनही घटणार!

By admin | Updated: November 20, 2014 22:57 IST

यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत लोटणाराच ठरत आहे़ उशीरा झालेल्या पेरणीमुळे सोयाबीन पिकाचा उतारा अत्यल्प आला़ आता लाल्याच्या आक्रमणामुळे कपाशीचे पिकही धोक्यात आले आहे़

समुद्रपूर : यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत लोटणाराच ठरत आहे़ उशीरा झालेल्या पेरणीमुळे सोयाबीन पिकाचा उतारा अत्यल्प आला़ आता लाल्याच्या आक्रमणामुळे कपाशीचे पिकही धोक्यात आले आहे़ सोयाबीन नाही व आता कपाशीचे उत्पादनही कमी होणार असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे़सध्या कपाशीवर लाल्या रोगाने आक्रमण केले आहे़ यामुळे कपाशीचा उतारा २ ते ३ क्विंटलवर आला आहे़ एक एकर कापसाला लागणारा किमान खर्च नांगरणी १००० रुपये, फन्नाट ५०० रुपये, बियाणे १८६० रुपये, खते ५५२० व इतर ४ हजार ६६० असा एकूण खर्च दर एकरी १३ हजार २४० रुपये येतो़ एकरी ३ क्विंटल कापूस झाल्यानंतर शेतकऱ्यांना चार हजार रुपये क्विंटल भावाने तो विकावा लागतो़ यात शेतकऱ्यांना १२ हजार रुपये मिळतात़ शेतकऱ्यांना कपाशीमध्येही १२४० रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याचे दिसते़ या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडत आहे़ सोयाबीनबाबतही हाच प्रकार घडत आहे़ एका एकराला लावडीकरिता नांगरणी १००० रुपये, फवारणी ५०० रुपये, बियाणे १९०० रुपये, खते १००० रुपये, फवारणी १२०० रुपये, सवंगणी १००० रुपये, काढणी खर्च ४०० रुपये असा एकूण सोयाबीनचा खर्च सात हजार रुपये येतो़ एकरी सोयाबीनचे उत्पादन २ क्विंटल होत आहे़ हे सोयाबीन शेतकऱ्यांना ३ हजार रुपये दराने विकून केवळ ६ हजार रुपये प्राप्त होत आहेत़ यामुळे यातही एक हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे़ अन्य पिकांची स्थितीही अशीच आहे़ यामुळे शेती करावी की नको, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत़ अशा स्थितीत शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे़(तालुका प्रतिनिधी)