शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
4
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
5
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
6
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
7
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
8
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
9
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
10
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
11
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
12
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
13
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
15
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
16
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
17
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
18
राखीव प्रवर्गांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाला स्थगिती, मंत्रिमंडळाचा निर्णय : महाधिवक्त्यांचे मत घेणार
19
जगातील टॉप-१०० मधून भारतीय कंपन्या हद्दपार; रिलायन्सही या स्थानावर घसरली...
20
मंदिरांमधील सोने सरकार विकणार आहे ? चर्चा आणि अफवांना सरकारने दिला पूर्णविराम 
Daily Top 2Weekly Top 5

रूई गाठीच्या उभ्या ट्रकने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 23:27 IST

रुईच्या गाठी भरून असलेल्या ट्रकला अचानक आग लागली. यात ट्रकसह संपूर्ण गाठी जळून भस्मसात झाल्या. ही घटना गुरूवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास सातेफळ मार्गावर घडली.

ठळक मुद्देअडीच टन रूई भस्मसात : सातेफळ मार्गावरील घटना

ऑनलाईन लोकमत
हिंगणघाट : रुईच्या गाठी भरून असलेल्या ट्रकला अचानक आग लागली. यात ट्रकसह संपूर्ण गाठी जळून भस्मसात झाल्या. ही घटना गुरूवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास सातेफळ मार्गावर घडली.
जाम येथील पीव्ही टेक्सटाईल्स या सूत गिरणीतून रूईच्या गाठी घेऊन साईबाबा ट्रान्सपोर्ट या एजन्सीचा ट्रक क्र. एमएच ३२ बी ४७६९ यवतमाळ येथे जाण्याकरिता निघाला होता. हिंगणघाट येथे आल्यावर ट्रक मालक महादेव चंदेल यांच्या सातेफळ रस्यावरील घरासमोर ट्रक उभा ठेऊन चालक मोहम्मद अली मोहम्मद इब्राहिम रा. संत कबीर वॉर्ड हा जेवण करण्याकरिता घरी गेला. काही वेळाने तो परत आला व यवतमाळ येथे जाण्याकरिता त्याने ट्रक सुरु केला असता मागील बाजूने धूर निघत असल्याचे लक्षात आले. त्यांनी गाडी बंद करून ट्रकचे क्लिनर चिंतामण कापटे यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला; पण यश आले नाही. अवघ्या काही वेळातच संपूर्ण ट्रकला आगीने कवेत घेतले. हिंगणघाट अग्निशमनच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. यामुळे आग लोकवस्तीत पसरली नाही. यामुळे मोठी हानी टळली; पण आगीत संपूर्ण ट्रक व सुमारे २.५ टण रुईच्या गाठी जळून खाक झाल्या. यात मोठे नुकसान झाले असून अंदाज घेणे सुरू आहे. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून जमादार विनोद कांबळे व गजानन जाचक पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :fireआग