कोरोनाचे सावट; संचारबंदीचा तिसरा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 06:00 IST2020-03-27T06:00:00+5:302020-03-27T06:00:10+5:30

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी रात्रीपासून संचारबंदी लागू केली. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने प्रभावी नियोजन केले. पूर्वी शहरातील विविध रस्त्यालगत भरणारा भाजी बाजार इतरत्र हलवित शहरात आता स्वावलंबी विद्यालयाचे मैदान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा अशा केवळ दोन ठिकाणीच भाजी बाजार भरविला जात आहे.

Corona ; The third day | कोरोनाचे सावट; संचारबंदीचा तिसरा दिवस

कोरोनाचे सावट; संचारबंदीचा तिसरा दिवस

ठळक मुद्देशहरातील रस्त्यांवरील गर्दी ओसरली : चौकाचौकात पोलिसांचा बंदोबस्त, ट्रान्सपोर्टिंगलाही लागले ‘ब्रेक’

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी रात्रीपासून संचारबंदी लागू केली. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने प्रभावी नियोजन केले. पूर्वी शहरातील विविध रस्त्यालगत भरणारा भाजी बाजार इतरत्र हलवित शहरात आता स्वावलंबी विद्यालयाचे मैदान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा अशा केवळ दोन ठिकाणीच भाजी बाजार भरविला जात आहे. संचारबंदीची परिस्थिती लक्षात घेता अनेक सेवा ठप्प झाल्याने जिल्ह्यातील गावखेड्यातही विशेष नियोजन करण्यात आले आहे. संकटळातही कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी, महावितरणचे कर्मचारी, औषधविक्रेते एवढेच नव्हे तर निराधार, भिक्षेकऱ्यांनाही खाद्य, सरबत, खबरदारीकरिताकरिता मास्क पुरवत विविध संघटनांकडून सामाजिक दायित्वाचा परिचय दिला जात आहे.

Web Title: Corona ; The third day