शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चानकी, जयपूर, चारमंडळ गावांत कोरोना स्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 05:00 IST

हमदापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत चानकी गावात २३, जयपूर येथे ४३, तर चारमंडळ येथे ३१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती केंद्रातून मिळाली आहे. त्यामुळे कोरोनाचा विस्फोट आता ग्रामीण भागातही होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. याची सुरुवात १२ एप्रिलपासून सुरू झालेली आहे. जयपूर येथील एक भाग कंटेनमेंट आणि बफर झोन तयार करण्यात आल्याने परिसर सील करण्यात आला आहे.

ठळक मुद्देतब्बल ९७ व्यक्ती आढळल्या बाधित : नागरिकांची बेफिकिरी कारणीभूत

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून प्रशासनाकडून युद्धस्तरावर उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र, नागरिकांचा बेजबाबदारपणा आणि बेफिकिरी वाढत चालली असून हमदापूर प्राथमिक आराेग्य केंद्रातील चानकी, चारमंडळ, जयपूर गावांत कोरोनाचा विस्फोट होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. हमदापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत चानकी गावात २३, जयपूर येथे ४३, तर चारमंडळ येथे ३१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती केंद्रातून मिळाली आहे. त्यामुळे कोरोनाचा विस्फोट आता ग्रामीण भागातही होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. याची सुरुवात १२ एप्रिलपासून सुरू झालेली आहे. जयपूर येथील एक भाग कंटेनमेंट आणि बफर झोन तयार करण्यात आल्याने परिसर सील करण्यात आला आहे. तिन्ही गावांना सेलू येथील तहसीलदार महेंद्र सोनवणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील बेले तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. कोरोना विषाणू वेगात पसरत असल्याने नागरिकांमध्ये कमालीची भीती वाढली असून ही धोक्याची घंटा आहे.

रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहे. सर्व जण गृहविलगीकरणात आहे. चानकी येथील एक बाधित रुग्ण सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल आहे. तिन्ही गावांची पाहणी करून माहिती घेतली आहे. दोन गावांतील भाग सील करण्याचा निर्णय वरिष्ठ घेतील. नागरिकांनी सतर्क आणि सुरक्षित राहणे आवश्यक आहे. डॉ. प्रणाली वानखेडे, वैद्यकीय अधिकारी, प्रा. आरोग्य केंद्र, हमदापूर

चिकनीसह परिसरात कोरोनाने केली एन्ट्रीमागील पंधरा दिवसात चिकनीसह परिसरात झपाट्याने कोरोना रूग्ण आढळून आले आहे. जामनी, पढेगाव, निमगाव, दहेगाव, केळापूर, बोदड आदी गावात कोरोनाचा शिरकाव झाला असून रूग्ण आढळून आले होते. पण, आता या गावात कोरोना नियंत्रणात आला असून धोका अद्यापही टळलेला नाही.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या