शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनरची दुचाकीला जबर धडक; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 06:00 IST

कंटेनरच्या चाकात धोंगडी सराम आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात होताच कंटेनर चालकाने घटनास्थळावरून यशस्वी पळ काढला. या अपघाताची माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. शिवाय पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. सदर अपघाताची नोंद सेलू पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सेलू पोलीस करीत आहेत.

ठळक मुद्देमृत येत होता तहसील कार्यालयाकडे

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : येथील विकास चौक भागात बायपास जवळ भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. अपघात होताच आरोपी कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची नोंद सेलू पोलिसांनी घेतली आहे. धोंगडी पांडुरंग सराम, असे मृतकाचे नाव असल्याचे सांगण्यात आले.प्राप्त माहितीनुसार, धोंगडी सराम हे वडगाव जंगली येथील माजी सरपंच आहेत. ते नेहमीच नागरिकांचे विविध प्रकारची कामे घेऊन सेलू येथील तहसील कार्यालयात येत होते. गुरूवारी ते नेहमी प्रमाणे वडगाव जंगली येथून एम. एच. ३२ ए.ए. २४३१ क्रमांकाच्या दुचाकीने सेलू येथील तहसील कार्यालयात जात होते. दुचाकी विकास चौका नजीकच्या बायपास परिसरात आली असता भरधाव असलेल्या एम.एच. ०४ एफ.यू १७२२ क्रमांकाच्या भरधाव कंटेनरने त्यांना जबर धडक दिली.यात कंटेनरच्या चाकात धोंगडी सराम आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात होताच कंटेनर चालकाने घटनास्थळावरून यशस्वी पळ काढला. या अपघाताची माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. शिवाय पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. सदर अपघाताची नोंद सेलू पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सेलू पोलीस करीत आहेत. या भागातून सध्या जड वाहने सुसाट पळविली जात आहे. शिवाय त्याकडे दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार असलेल्या पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी आहे.

टॅग्स :Accidentअपघात