शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

कांबळे यांना बांधकाम, अग्रवाल यांना कृषी समिती

By admin | Updated: October 18, 2014 01:47 IST

जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा शुक्रवारी पार पडली़ या सभेत सभापतींना विषय समित्यांचे वाटप करण्यात आले़ ...

वर्धा : जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा शुक्रवारी पार पडली़ या सभेत सभापतींना विषय समित्यांचे वाटप करण्यात आले़ यामध्ये बांधकाम व अर्थ समिती उपाध्यक्ष विलास कांबळे यांना देण्यात आले़ यापूर्वी उपाध्यक्षांकडे कृषी व पशु संवर्धन ही समिती होती़ नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी हा बदल केला असून कृषी व पशुसंवर्धन समिती श्यामलता अग्रवाल यांच्याकडे सोपविण्यात आली़अध्यक्ष चित्रा रणनवरे यांच्याकडे जल व्यवस्थापन व सामान्य प्रशासन कायम ठेवण्यात आले़ कृषी व पशुसंवर्धन समितीची जबाबदारी सभापती श्यामलता अग्रवाल यांना देण्यात आली़ अग्रवाल यांच्या रूपाने नाचणगाव जि़प़ गटाला पहिल्यांदाच सभापती पदाचा मान मिळाला आहे़ महिला सभापतीला कृषी व पशुसंवर्धन ही समिती दुसऱ्यांदा महिला सभापतीला मिळाली आहे़सभापती मिलिंद भेंडे यांना शिक्षण व आरोग्य समितीची जबाबदारी देण्यात आली़ भेंडे दुसऱ्यांदा सभापती झाले असून ते काँग्रेसमध्ये असताना त्यांच्याकडे हीच विषय समिती होती़ सभापती वसंतराव पाचोडे यांच्यावर समाज कल्याण समितीची जबाबदारी सोपविण्यात आली़ सभापती चेतना मानमोडे यांच्याकडे महिला व बाल कल्याण समिती सोपविण्यात आली़नवीन पदाधिकाऱ्यांमध्ये मिलिंद भेंडे जि़प़ सदस्य म्हणून दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. इतर सर्व पदाधिकारी हे पहिल्यांदाच जि़प़मध्ये निवडून गेले आहे़ चित्रा रणनवरे यांच्या रूपाने हिंगणी, विलास कांबळे यांच्या रूपाने सावंगी (मेघे), मिलिंद भेंडे यांच्या रूपाने तळेगाव (टा़), श्यामलता अग्रवाल यांच्या रूपाने नाचणगाव, वसंत पाचोडे यांच्या रूपाने जळगाव, तर चेतना मानमोडे यांच्या रूपाने कारंजा जि.प. सर्कलला सभापतीपदाचा बहुमान मिळाला आहे़ सभेनंतर नवीन पदाधिकाऱ्यांनी आपला पदभार स्वीकारला.(जिल्हा प्रतिनिधी)