मार्केटिंग कार्यालयातील संगणक चोर गजाआड

By Admin | Updated: September 6, 2015 02:05 IST2015-09-06T02:05:31+5:302015-09-06T02:05:31+5:30

येथील जिल्हा मार्केटिंग कार्यालयातील संगणक लंपास करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

Computer Chor GazaAd in Marketing Office | मार्केटिंग कार्यालयातील संगणक चोर गजाआड

मार्केटिंग कार्यालयातील संगणक चोर गजाआड

एकाला अटक : आणखी चोऱ्या उघड होण्याची शक्यता
वर्धा : येथील जिल्हा मार्केटिंग कार्यालयातील संगणक लंपास करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. चोरट्याजवळून चोरीतील संगणक व एक दुचाकी जप्त करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्याय पोलिसांनी शुक्रवारी रात्री केली.
अजिंक्य जयप्रकाश भिसे (२६) रा. भाजी मार्केट असे आरोपीचे नाव असल्याचे सांण्यात आले आहे. त्याच्याकडून आणखी चोऱ्या उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.पोलीस सुत्रांनुसार, जिल्हा मार्केटींग अधिकारी शेख बिलाल शेख याकुब यांनी कार्यालयातील संगणक संच लंपास झाल्याची तक्रार गुरुवारी दाखल केली होती. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केला असता, मिळालेल्या माहितीवरून सदर गुन्ह्यात भाजी मार्केट, या भागात राहणाऱ्या अजिंक्य भिसे याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याचे ताब्यातील वाहन क्र.एमएच.४० आर १२७७ ची शहानिशा केली असता सदर गाडी चोरीची असून सदर प्रकरणात शहर पोलिस भादंवि कलम ३७९ चा गुन्हा असल्याबाबत माहिती मिळाली. यावरून अजिंक्य भिसे याला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक एम.डी. चाटे, दयसिंग बारवाल, अशोक वाट, नरेंद्र डहाके, गजानन कठाणे, तुषार भूते, दिवाकर परिमळ, अमर लाखे, आनंद भस्मे, समीर कडवे, सचिन खैरकार यांनी केली.(प्रतिनिधी)

Web Title: Computer Chor GazaAd in Marketing Office