शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा, हिंगणघाट व पुलगावात अस्वच्छतेचा कळस

By admin | Updated: November 1, 2014 02:05 IST

मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कीटकजन्य आजाराने थैमान घातले आहे. याला सर्वस्वी ठिकठिकाणी असलेला अस्वच्छतेचा कळस कारणीभूत आहे.

वर्धा : मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कीटकजन्य आजाराने थैमान घातले आहे. याला सर्वस्वी ठिकठिकाणी असलेला अस्वच्छतेचा कळस कारणीभूत आहे. मात्र जनतेनीच घरात आणि परिसरात स्वच्छता पाळावी, असे आवाहन केले जात आहे. मात्र कीटकजन्य आजाराच्या रडारवर असलेले वर्धा, हिंगणघाट आणि देवळी तालुका प्रशासन स्वच्छता राबविण्यात कसूर करीत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी नागरिकांना या आजाराचा सामना करावा लागत असल्याचे विदारक वास्तव पुढे आले आहे.जिल्हा आरोग्य विभागाच्या लेखी सद्यस्थितीत या तिनही तालुक्यात कीटकजन्य आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. विशेष करुन वर्धा, हिंगणघाट आणि पुलगाव पालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य असल्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र संबंधित पालिका प्रशासन याबाबत गांभिर्याने घेत नसल्याचे दिसून येते. जिल्ह्यात डेंग्यूची लागण होताच जिल्हा आरोग्य विभागामार्फत ग्रामीण भागात मानवी साखळीच्या माध्यमातून जनतेला स्वच्छता राखण्याचा संदेश देण्यात आला. या अनुषंगाने बहुतांश नागरिकांमध्ये जागृतीही आली. अनेक घरात स्वच्छता राबिवण्यात आली. नुकताच दिवाळीचा सण झाल्यामुळे त्या पार्श्वभूमीवर जवळपास सर्वच घरात स्वच्छता करण्यात आली. मात्र शहर आणि ग्रामीण भागातील सार्वजनिक स्थळांचीच स्वच्छता करण्याची सवड ग्रामपंचायत व नगर पालिका प्रशासनाला मिळालेली नाही. असे नव्हे, तर जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असे एकंदर चित्र आहे.सर्वप्रथम देवळी तालुक्यातील पुलगाव शहरात डेंग्यूचा प्रकोप झाला. यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली. यानंतर आता डेंग्यूचा शिरकाव हिंगणघाट आणि वर्धा शहरात होत आहे. मात्र अद्यापही या दोन्ही नगर प्रशासनात स्वच्छतेबाबत जनजागृती झाल्याचे शहरात ठिकठिकाणी बघायला मिळत असलेल्या उकिरड्यावरुन दिसून येते.आॅक्टोबरमध्ये ८० पैकी ३९ नमुने पॉझिटिव्हजानेवारीपासून जिल्ह्यात १४७६ रुग्णांचे रक्त नमुने सेवाग्राम येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. पैकी १९० नमुने डेंग्यू पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये आॅक्टोबर महिन्यातील ८० रुग्णांच्या रक्त नमुन्यांचा समावेश होता. पैकी ३९ नमुने पॉझिटिव्ह आढळले आहे. यावरुन जिल्ह्यात डेंग्यूचा प्रकोप लक्षात घेण्यासारखा आहे. यातील बहुतांश रुग्ण हे वर्धा, देवळी आणि हिंगणघाट तालुक्यातील असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. मात्र याबाबत तालुका व नगर पालिका प्रशासन उदासीनता बाळगून असल्याचे दिसून येत आहे.आतापर्यंत चार जणांचा मृत्यूआतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात झालेली आहे, यामध्ये चार मृत्यू डेंग्यू आजाराने तर एक मृत्यू इतर आजाराने झाल्याचेही विभागाचे म्हणणे आहे.(जिल्हा प्रतिनिधी)