शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम पाणीटंचाईमुळे नागरिकांची होरपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 05:00 IST

शहरातील संजयनगर झोपडपट्टी भागात किमान दोनशे घरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. आर्वी येथे ब्रिटिशकालीन सारंगपुरी जलाशय आहे. १९१६ पासून याच जलाशयातील पाणी २००६ पर्यंत आर्वीकरांना ओल्ड टाउन शाळा आणि दाऊतपूर येथील जलकुंभांतून पाणीपुरवठा होत होता.

ठळक मुद्देआर्वीतील परिस्थिती : २०० घरांना मिळेना पाणी, टँकरने पाणीपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : शहरात प्रखर उष्णतामानासोबतच नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. तब्बल २०० कुटुंबे पाण्याविना तहानलेली आहे. परिणामी, १५ ते २० दिवसांपासून पालिकेद्वारे नागरिकांना टॅकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचे चित्र आहे.शहरातील संजयनगर झोपडपट्टी भागात किमान दोनशे घरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. आर्वी येथे ब्रिटिशकालीन सारंगपुरी जलाशय आहे. १९१६ पासून याच जलाशयातील पाणी २००६ पर्यंत आर्वीकरांना ओल्ड टाउन शाळा आणि दाऊतपूर येथील जलकुंभांतून पाणीपुरवठा होत होता. त्यानंतर जीवन प्राधिकरणाला नगरपालिकेने नळ पुरवठा योजना हस्तांतरित केली. तेव्हापासून देऊरवाडा-वर्धा नदीवरून जीवन प्राधिकरण जलवाहिनीद्वारे शहराला पाणीपुरवठा करीत आहे. मात्र, या विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे काही भागात पाणीपुरवठा होत नाही. काही भागात वारंवार जलवाहिनी नादुरुस्त होते.संजयनगर परिसरात या जलवाहिनीचे पाणी पोहोचत नाही. त्यामुळे जवळपास दोनशे घरांची पाण्याविना होरपळ होत आहे. याबाबत वारंवार माहिती देऊनही दुर्लक्ष केले जात असल्याची नागरिकांची ओरड आहे.पालिकेच्या मालकीच्या टँकरने एक दिवसाआड संजयनगरच्या जवळपास दोनशे घरांना पाणीपुरवठा केला जातो. कधी-कधी दोन-तीन फेऱ्या घालाव्या लागतात. पाण्यासाठी गर्दी होऊ दिली जात नाही. सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात आहे. कन्नमवारनगर येथे पाणी टँकरने पोहोचविले जात आहे.- गजानन वानखडे, टँकर चालक, नगरपालिका, आर्वी.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई