छत्रपती शिवरायांचे राज्य हे खरे लोक कल्याणकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 06:00 AM2020-02-26T06:00:00+5:302020-02-26T06:00:11+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात कुठलाही जाती अथवा धर्मभेद न जोपासता गुण आणि कर्तृत्वावर प्रजेतील सर्वांना समान संधी दिली. सर्वच रयतेला पोटच्या पोराप्रमाणे जपले, म्हणूनच छत्रपती शिवरायांचे राज्य हे खरे लोक कल्याणकारी राज्य होते, असे मत प्रसिद्ध वक्ते प्रवीण देशमुख यांनी व्यक्त केले. मराठा सेवा संघाद्वारे आयोजित शिवजयंती महोत्सवात ते बोलत होते.

Chhatrapati Shivaji's kingdom is a real people's welfare | छत्रपती शिवरायांचे राज्य हे खरे लोक कल्याणकारी

छत्रपती शिवरायांचे राज्य हे खरे लोक कल्याणकारी

Next
ठळक मुद्देप्रवीण देशमुख : शिवजयंतीनिमित्त व्याख्यानमाला; वर्धेकरांची मोठी उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात कुठलाही जाती अथवा धर्मभेद न जोपासता गुण आणि कर्तृत्वावर प्रजेतील सर्वांना समान संधी दिली. सर्वच रयतेला पोटच्या पोराप्रमाणे जपले, म्हणूनच छत्रपती शिवरायांचे राज्य हे खरे लोक कल्याणकारी राज्य होते, असे मत प्रसिद्ध वक्ते प्रवीण देशमुख यांनी व्यक्त केले. मराठा सेवा संघाद्वारे आयोजित शिवजयंती महोत्सवात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष ओंकार धावडे, कार्यकारी अभियंता रवींद्र वºहाडे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ वानखेडे, सहाय्यक कार्यकारी अभियंता संदीप हासे, उपविभागीय अभियंता संजय मंत्री, सहाय्यक अभियंता संजय मानकर, पोलीस निरीक्षक धनाजी जळक, मोहन वडतकर, कोटंब्याच्या सरपंच रेणुका कोटंबकार, विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष योगिता इंगळे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मंगेश विधळे, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष नीरज बुटे, विधी व न्याय परिषदेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. कपिल गोडघाटे उपस्थित होते. वैष्णवी भोयर, रिंकू भोयर यांनी गायलेल्या जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.
प्रा. देशमुख म्हणाले, युद्धप्रसंगी कुराण, बायबल अथवा कुठलाही धर्मग्रंथ सापडल्यास सन्मानपूर्वक जतन करण्याचे महाराजांचे आदेश होते. मात्र, आज देशात महाराजांच्या सहिष्णू धार्मिक धोरणाविरुद्ध काम सुरू असून धर्म आणि जातीत फूट पाडण्याचे काम सुरू आहे. शिवराय हे पर स्त्रीला मातेसमान मानत असत, याचा संदर्भ संत तुकाराम महाराजांच्या अभंगात असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी विश्व हिंदी विद्यापीठाचे जीवन कोडापे, प्रकाश वानखेडे, भूषण तुरणकर यांनी महाराजांच्या जीवनकार्यावर पोवाडा सादर केला. तर ‘शिवरायांची शौर्यगाथा’ ही नाटिका लखोटिया भुतडा विद्यालय कोंढाळीच्या विद्यार्थ्यांनी सादर केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर गिºहे तर संचालन अनिता येवले व अनिकेत जाधव यांनी केले. आभार किशोर जगताप यांनी मानले. कार्यक्रमास मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाला वर्धेकर नागरिकांची मोठी उपस्थिती उपस्थिती होती.
 

Web Title: Chhatrapati Shivaji's kingdom is a real people's welfare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.