कोर्‍या मुद्रांकाचा गैरवापर करुन केली फसवणूक

By Admin | Updated: June 6, 2014 00:09 IST2014-06-06T00:09:47+5:302014-06-06T00:09:47+5:30

सावकाराकडून कर्ज घेताना कोर्‍या मुद्रांकावर दिलेल्या सहीचा दुरुपयोग करीत शेतकर्‍याची फसवणुक केली. सावकाराने शेतकर्‍याच्या स्थावर मालमत्तेवर अधिकार दाखवत त्याची मालमत्ता परस्पर हडपण्याचा

Cheating by using a screwdriver of a dry stamp | कोर्‍या मुद्रांकाचा गैरवापर करुन केली फसवणूक

कोर्‍या मुद्रांकाचा गैरवापर करुन केली फसवणूक

वर्धा : सावकाराकडून कर्ज घेताना कोर्‍या मुद्रांकावर दिलेल्या सहीचा दुरुपयोग करीत शेतकर्‍याची फसवणुक केली. सावकाराने शेतकर्‍याच्या स्थावर मालमत्तेवर अधिकार दाखवत त्याची मालमत्ता परस्पर हडपण्याचा प्रयत्न सावकाराकडून होत आहे. याविरोधात शेतकर्‍याने प्रशासनाकडे तक्रार दाखल करीत न्यायाची मागणी केली आहे.
सहाय्यक निबंधकाकडे शेतकरी शंकर बोरकर यांनी तक्रार करुन न्यायाची मागणी केली आहे. या निवेदनानुसार गजानननगर पिपरी(मेघे) येथील शंकर नारायण बोरकर यांनी सुकळी(स्टे.) येथील मेघश्याम नत्थूजी जाधव यांच्याकडून १५ हजार रुपयाचे कर्ज घेतले होते. याकरिता ५ टक्के व्याजदर आकारण्यात आला होता. हा व्याजदर करताना बोरकर यांनी जाधवला २0 रुपयाच्या मुद्रांकावर सही दिली होती. यावेळी हा मुद्रांक कोरा होता. कालांतराने बोरकरने कर्जाने घेतलेली रक्कम व व्याज जाधवला परत केले. यानंतर व्यवहाराची प्रक्रीया पूर्ण झाली होती. मात्र जाधवने कागदपत्र वेळेवर परत सदर इसमाने दिलेल्या कोर्‍या मुद्रांकाचा गैरफायदा घेत त्याच्या स्थावर मालमत्तेवर हक्क दाखविला. तसेच घराची विक्री करण्यासाठी सौदाचिठ्ठी केली याची  माहिती बोरकर यांना मिळताच त्यांनी जाधवकडे याबाबत विचारणा केली. तसेच पैसे घेताना दिलेला मुद्रांकही परत मागितला. त्यावेळी जाधवने मुद्रांक परत करण्याकरिता नकार दिला. व्याजासहित मुद्दलालचीरक्कम परत केल्यानंतरही जाधवकडून बोरकरला पैशाकरिता वारंवार धमकावणी होत असत. या प्रकाराला कंटाळलेल्या बोरकर यांनी शासनाकडे न्यायाची मागणी केली.
सावकाराकडे सततच्या हेलपाटा मारुन कंटाळलेल्या बोरकरने या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदींना पाठविलेला आहे. शासनाने सावकराच्या पाशातून जनतेची पिळवणूक थांबविण्यासाठी कायदा केला. या अंतर्गत बोरकर यांनी शासनाकडे न्यायाची मागणी केली आहे.(स्थानिक प्रतिनिधी)
 

Web Title: Cheating by using a screwdriver of a dry stamp