शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
3
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
4
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
5
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
6
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
7
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
8
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
9
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
10
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
11
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
12
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
13
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
14
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
15
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
16
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
17
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
18
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
19
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
20
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
Daily Top 2Weekly Top 5

शहरात सीसीटीव्ही व पीएस सिस्टीम

By admin | Updated: December 22, 2015 02:55 IST

गुन्हेगारीवर आळा बसवून कायदा सुव्यवस्था राखण्याकरिता विविध भागातील घडामोंडीवर लक्ष ठेवण्याकरिता

वर्धा : गुन्हेगारीवर आळा बसवून कायदा सुव्यवस्था राखण्याकरिता विविध भागातील घडामोंडीवर लक्ष ठेवण्याकरिता सीसीटीव्ही कॅमेरे व वाहतूक नियंत्रणासह अत्यावश्यक बाबी नागरिकांपर्यंत तत्काळ पोहोचविण्याच्या दृष्टीने पीएस सिस्टीम वर्धा शहरवासीयांच्या सेवेत रूजू होणार आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवी झेंडी दिली आहे. शिवाय या कामाकरिता एक कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
विस्तारीत होत असलेल्या वर्धा शहरातील कानोकोपऱ्यात विविध घटना घडत आहेत. यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहेत. या प्रकारांवर आळा बसविण्याचे पोलीस विभागाचे प्रयत्न आहेत. बऱ्याच घटनांची माहिती पोलिसांना उशिरा मिळत असल्याने त्यावर वेळीच आळा बसविणे कठीण जात आहे. यामुळे शहरातील कानाकोपऱ्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावात सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह शहरात अद्ययावत पीएस सिस्टीम (पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीम) सुरू करण्याचा उल्लेख होता. या कामाकरिता एक कोटी रुपयांचा खर्च होणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आला होता.
या प्रस्तावाला जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी मान्यता दिली आहे. शिवाय लागणारा खर्चही मंजूर करण्यात आला आहे. या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे. शहरात यापूर्वी आर्वी नाका व बजाज चौक परिसरात सीसीटीव्ही कमेरे लावण्यात आले होते. काही दिवस ते सुरळीत सुरू राहिले. कालांतराने त्यातील काही कॅमेरे बंद पडले. त्यांचा दुरूस्तीचा प्रस्तावही शासनाकडे असल्याची माहिती आहे.(प्रतिनिधी)

पारधी समाजाला रोजगार उपलब्ध करण्याकरिता पाच लाखांचे अनुदान
४जिल्ह्यातील गुन्ह्याचा विचार केल्यास यात पारधी समाजाचा मोठा वाटा असल्याचे दिसून येते. या समाजाकडून दारूभट्टी वा चोऱ्यांचे गुन्हे घडत आहेत. या समाजातील नागरिकांनी या व्यवसायापासून दूर व्हावे या उद्देशाने समाजबांधवांना मगनवाडी येथील महात्मा गांधी ग्रामीण औद्योगीकरण संस्थेत प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावालाही जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाली आहे. याकरिता पाच लाख रुपये देण्यात येणार असल्याची माहिती आहे. या निधीतून प्रशिक्षण घेणाऱ्या पारधी समाजातील नागरिकांना कुटीर उद्योग सुरू करण्याकरिता आवश्यक साधन सामग्री उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले आहे.

एक कोटी रुपयांत होणारी कामे
४सीसीटीव्ही- वर्धा शहरातील गुन्ह्यांवर प्रतिबंध लावण्याकरिता कायदा व सुव्यवस्था राखणे शहरातील वाहतूक सुरळीत करण्याकरिता सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत.
४पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीम - कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पीएस सिस्टीमच्या मदतीने नागरिकांना सूचना देता येतील. नागरिकांना मार्गदर्शन करून शांतता राखण्याबाबत सुचीत करणे, अफवावर आळा घालण्याचे काम यातून होणार आहे.
४सुसज्ज नियंत्रण कक्ष - महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही द्वारे लक्ष ठेवण्याकरिता सुसज्ज नियंत्रण कक्ष तयार करण्यात येणार आहे. रियल टाईम मॉनीटरींग करण्यात याचा लाभ होणार आहे.