शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

मोकाटपणे फिरणाऱ्यांना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 05:00 IST

पोलिसांनी सांगितले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाउन सुरू आहे. याला स्थानिक नागरिकांतून प्रतिसाद मिळत आहे. मात्र, काही हौशी मंडळी भाजीपाला आणि क्षुल्लक कारण पुढे करत दिवस-दिवस रस्त्यांवर मोकाटपणे वावरत असल्याचे पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आले. दरम्यान पोलिसांनी काही दिवस शिथिल धोरण अवलंबले. मात्र, अशा लोकांमध्ये कुठलाही फरक जाणवत नसल्याचे दिसून आले.

ठळक मुद्दे२१ दुचाकी जप्त : आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई, घरातच बसण्याचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ‘लॉकडाउन’च्या काळात क्षुल्लक कारणाबरोबरच विनाकारण रस्त्यावर मोकाटपणे वावरणाºयांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला असून जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत तब्बल २१ पेक्षा जास्त दुचाकी जप्त करण्यात आला आहे. मंगळवारपासून पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली असून त्यांना दंडही ठोठवण्यात आला आहे.पोलिसांनी सांगितले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाउन सुरू आहे. याला स्थानिक नागरिकांतून प्रतिसाद मिळत आहे. मात्र, काही हौशी मंडळी भाजीपाला आणि क्षुल्लक कारण पुढे करत दिवस-दिवस रस्त्यांवर मोकाटपणे वावरत असल्याचे पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आले. दरम्यान पोलिसांनी काही दिवस शिथिल धोरण अवलंबले. मात्र, अशा लोकांमध्ये कुठलाही फरक जाणवत नसल्याचे दिसून आले. मंगळवारपासून जिल्ह्यातील पोलिसांनी आपल्या कारवाईत कडकपणा आणला आहे. परिणामी, जिल्ह्यातील शहरांमधील वेगवेगळ्या रस्त्यांवर विनाकारण फिरणारी तब्बल २१ पेक्षा जास्त वाहने जप्त केली आहे. यामध्ये वर्धा पोलीस ठाण्यांतर्गत ११ दुचाकी, रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत ५, पुलगाव पोलीस ठाण्यांतर्गत १, समुद्रपूर पोलीस ठाण्यांतर्गत १ तर हिंगणघाट पोलीस ठाण्यांतर्गत ३ दुचाकी पोलीसांनी जप्त केल्या आहेत. त्यामुळे यापुढे रस्त्यावर विनाकारण फिरणाºयांवर वाहन जप्तीसह गुन्हे दाखल होणार आहे.विनाकारण फिरणे पडणार महागातकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभर लॉकडाउन सुरू आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरातच थांबावे, मात्र, काही हौशी मंडळी क्षुल्लक कारणासाठी घराबाहेर पडून रस्त्यांवर गर्दी करीत असल्याचे आढळून आले आहे. यापुढे अशांच्या दुचाकी जप्त करीत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.शहरात चार ठिकाणी नाकाबंदीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेने कारवाईला गती आणली असून शहरातील बजाज चौक, पावडे चौक, आर्वीनाका, शिवाजी चौकात नाकाबंदी करण्यात आली आहे. बुधवारी अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे यांनी शिवाजी चौकात विनाकारण फिरणाºयांच्या दुचाकी जप्त करीत त्यांच्यावर कारवाई केली. शहर, रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या कारवाईत २५ ते ३० दुचाकी जप्त करण्यात आल्या.प्रारंभीचे काही दिवस प्रशासनाने याकडे शिथिलतेने पहिले. मात्र, विनाकारण फिरणाºयांमध्ये कुठलाही फरक पडला नाही. परिणामी, अशांच्या दुचाकी जप्त करून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई निरंतर सुरू राहील.- नीलेश मोरे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस