शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

यशोदा नदीवरील पूल खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 06:00 IST

गुरूवारी सायंकाळी एकाएक नदीच्या पुलाची एक बाजू खचली. ही घटना नांदोराकडून देवळीकडे जाणाऱ्या एका नागरिकाच्या लक्षात आली. त्याने घटनेची माहिती इतरांना दिल्यानंतर पोलिसानाही माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याचा फलक लावला.

ठळक मुद्देदेवळी-नांदोरा मार्ग बंद : पोलिसांनी धोका टाळण्यासाठी लावले कठडे

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : सततच्या पावसामुळे यशोदा नदीवरील पूल खचला. त्यामुळे देवळी-नांदोरा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. गुरूवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस येताच सतर्कतेचा एक भाग म्हणून देवळी पोलिसांनी या मार्गाच्या दोन्ही बाजूंनी लोखंडी कठडे लावून मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याचा सूचना फलक लावला आहे.गुरूवारी सायंकाळी एकाएक नदीच्या पुलाची एक बाजू खचली. ही घटना नांदोराकडून देवळीकडे जाणाऱ्या एका नागरिकाच्या लक्षात आली. त्याने घटनेची माहिती इतरांना दिल्यानंतर पोलिसानाही माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याचा फलक लावला. हा पूल अनेक वर्षांपासून दुर्लक्षीत असून नादुरूस्त आहे. पुलाच्या कडाही तुटल्या आहेत. शिवाय पुलावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहे.सदर बाब बांधकाम विभागाच्या लक्षात आणून दिल्यावरही त्याकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानली जात आहे. प्रशासनाचे नियोजन नसल्याने पुलाचे जुने बांधकाम दुर्लक्षित ठरले आहे. तालुक्यातील इतर ठिकाणी सुद्धा काही प्रमाणात अशीच परिस्थिती आहे. डिगडोह नदीवरील पुलाचे एक बाजू पूर्णत: खरडून गेली आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे.नाल्यावरील रपट्याला काही ठिकाणी भेगा पडल्या आहे. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन वेळीच उपाययोजना करावी, अशी मागणी आहे.बोरी मार्गावरील पूल खचलाबोरधरण - बोरी येथील गावाजवळील पूल पुरामुळे खचला. अर्धाअधिक पूल खचल्याने या मार्गाने चार चाकी वाहन जाणे कठीण झाले आहे. शिवाय दुचाकी चालकांना जीव मुठीत घेऊनच पूल पार करावा लागत आहे. या मार्गावरील प्रवास एखाद्याच्या जीवावर बेतल्यावर दुरूस्तीचे काम हाती घेणार काय, असा प्रश्न या भागातील नागरिकांकडून विचारला जात आहे.चार दिवसांपासून पुलावरील पाणी कमी होईनाआंजी (मोठी) - येथून ४ किमी अंतरावर असलेल्या खैरी येथील ग्रामस्थांच्या अडचणीत सध्या चांगलीच भर पडली आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने मागील चार दिवसांपासून या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. विशेष म्हणजे कुठलेही साहित्य खरेदी करण्यासाठी या गावातील नागरिकांना आंजी (मोठी) येथे यावे लागते.सेलू तालुक्याच्या शेवटच्या टोकावर ६०० लोकसंख्या असणारे खैरी हे गाव आहे. या गावाचा प्रत्येक कामासाठी आंजी (मोठी) या गावाशी संपर्क पडतो. वर्धा-आर्वी मार्गावरून या गावात जाण्यासाठी जोड रस्त्यावर धाम नदी वरून पूल आहे. परंतु, तो छोटा असल्याने आणि त्याची उंचीही कमी असल्याने पावसाळ्यात या गावातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो.मागील चार दिवसांपासून याच पुलावरून सतत पुराचे पाणी वाहत आहे. शिवाय वाहणाºया पाण्याला चांगलाच प्रवाह असल्याने या पुलावरून ये-जा करणे कठीण झाले आहे. काही जण जीव मुठीत घेऊन हा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे हा प्रकार एखाद्या अनुचित घटनेला निमंत्रण देणारा ठरत आहे. पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी गत २० वर्षांपासून होत असून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दहा वर्षांपूर्वी या गावातील नागरिकांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता, हे विशेष.

टॅग्स :Policeपोलिसroad transportरस्ते वाहतूक