पिपरीच्या नवरदेवाचे वऱ्हाड पॉझिटिव्हच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 05:00 AM2020-07-11T05:00:00+5:302020-07-11T05:00:48+5:30

पिपरी (मेघे) येथील एका नवविवाहित युवकाचा कोविड अहवाल ७ जुलैला पॉझिटिव्ह आला होता. तर आज त्याच्या निकट संपर्कात आलेल्या त्याच्या पत्नीसह नवरदेवाच्या आईचा अहवाल सकाळी कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे सध्या पिपरी (मेघे) येथील कोविड बाधितांची संध्या तीन झाली आहे. तर याच युवकाच्या लग्न सोहळ्यातील विविध कार्यक्रमात पुढे राहणाऱ्या नवरदेवाचा १८ वर्षीय मामे भाऊ आणि १३ वर्षीय मामे बहिणीलाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल शुक्रवारी दुपारी आरोग्य विभागाला प्राप्त झाला.

The bridegroom of Pipri's bride is in the throes of positivity | पिपरीच्या नवरदेवाचे वऱ्हाड पॉझिटिव्हच्या विळख्यात

पिपरीच्या नवरदेवाचे वऱ्हाड पॉझिटिव्हच्या विळख्यात

Next
ठळक मुद्देकोरोना ब्लास्ट : नवरी, नवरदेवाची आई, मामेभाऊ-बहिणीला संसर्ग

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरानजीकच्या पिपरी (मेघे) येथील नवरदेवाचे चार वऱ्हाडी शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाच्या डोकेदुखीत भर पडली आहे. या नव्या कोरोना बाधितांमध्ये नवविवाहितेसह नवरदेवाची आई आणि इतवारा भागातील रहिवासी असलेला मामे भाऊ तसेच मामे बहिणीचा समावेश आहे. वर्धा शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या इतवारा भागात दोन रुग्ण आढळल्याने वर्धा शहरातही खळबळ उडाली आहे.
पिपरी (मेघे) येथील एका नवविवाहित युवकाचा कोविड अहवाल ७ जुलैला पॉझिटिव्ह आला होता. तर आज त्याच्या निकट संपर्कात आलेल्या त्याच्या पत्नीसह नवरदेवाच्या आईचा अहवाल सकाळी कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे सध्या पिपरी (मेघे) येथील कोविड बाधितांची संध्या तीन झाली आहे. तर याच युवकाच्या लग्न सोहळ्यातील विविध कार्यक्रमात पुढे राहणाऱ्या नवरदेवाचा १८ वर्षीय मामे भाऊ आणि १३ वर्षीय मामे बहिणीलाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल शुक्रवारी दुपारी आरोग्य विभागाला प्राप्त झाला.
पिपरी (मेघे) येथील ७ जुलै रोजी कोरोनाबाधित निघालेल्या रुग्णाच्या निकट संपर्कातील त्यांची पत्नी (वय २३) आणि आई (वय ५१) यांची कोरोना चाचणी शुक्रवारी पॉझिटिव्ह आली आहे. पिपरी (मेघे) येथील ३३ वर्षीय पुरुष कोरोना बाधित निघाल्यावर त्यांच्या निकट संपर्कातील ३० व्यक्तीचे स्त्राव नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी काही व्यक्तींचे अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले असून त्यातील चार व्यक्ती कोरोनाबधित असल्याचे निदान तपासणीअंती झाले आहे. या चारही कोरोना बाधितांना कोविड रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आहे. तर काहींचे अहवाल अस्पष्ट असल्याने त्यांची फेरतपासणी केली जाणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी सांगितले.

इतवारातील दोघांना लग्नसोहळा भोवला
पिपरी (मेघे) येथील युवकाच्या लग्नसोळ्याला जाण्यासह हळद आणि कंदुरीच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविणाºया इतवारा येथील दोघांना चांगलेच महागात पडले आहे. इतवारा येथील रहिवासी असलेले आणि नवरदेवाचा मामे भाऊ आणि मामे बहिण असलेल्या दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने वर्धा शहरातील इतवारा भागातील काही परिसर क्लस्टर कंटेन्मेंट कृती योजना अंमलात आणून सील करण्यात आला आहे. शिवाय या कोरोना बाधितांच्या निकट संपर्कात आलेल्यांचा शोध आरोग्य विभागाकडून घेतला जात आहे.

आर्वीच्या जाजूवाडीने घेतला मोकळा श्वास
आर्वी : जाजूवाडी भागात कोरोना रुग्ण आढळल्याने या परिसरात संचारबंदी लागू करून कंटेन्मेंट तसेच बफर झोन तयार करण्यात आला होता. शुक्रवारी या परिसरातील कंटेन्मेंट झोन उपविभागीय न्याय दंडाधिकारी तथा उपविभागीय महसूल अधिकारी हरिष धार्मिक यांच्या आदेशान्वये उठविण्यात आला आहे.

पुलगाव शहरातील चित्रा टॉकीज भागातील कंटेन्मेंट झोन १४ दिवसांनंतर उठला
देवळी तालुक्यातील पुलगाव येथील चित्रा टॉकिज भागात कोरोना रुग्ण आढळल्यानंतर तेथे क्लस्टर कंटेन्मेंट कृती आराखडा अंमलात आणून संपूर्ण परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर करून सील करण्यात आला होता. मागील १४ दिवसांच्या काळात या कंटेन्मेंट झोन परिसरात कुठलाही नवीन कोरोना रुग्ण न आढळल्याने तेथील कंटेन्मेंट झोन शुक्रवारी उठविण्यात आला आहे. तसा आदेश उपविभागीय न्याय दंडाधिकारी तथा उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे यांनी निर्गमित केला आहे.

उपचारासाठी दाखल झाली अन् कोरोनाबाधित निघाली
सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेली ६५ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले आहे. ही महिला यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील रहिवासी असून तिच्या कोविड चाचणीचा अहवाल शुक्रवारी आरोग्य विभागाला प्राप्त झाला. या कोरोना रुग्णाची माहिती यवतमाळ जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे.

Web Title: The bridegroom of Pipri's bride is in the throes of positivity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.