शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बोर व्याघ्र प्रकल्पातील मचाणींची अवस्था दयनीय

By admin | Updated: October 15, 2015 02:29 IST

काहीच दिवसांपूर्वी वन्य जीव सुरक्षा जिल्ह्यात तसेच तालुक्यातही थाटामाटात राबविण्यात आला. या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात पैसाही खर्च झाला.

सेलू : काहीच दिवसांपूर्वी वन्य जीव सुरक्षा जिल्ह्यात तसेच तालुक्यातही थाटामाटात राबविण्यात आला. या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात पैसाही खर्च झाला. वन्य जिवांच्या नावावर मोठा निधी खर्च होत असतानाही सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाची अवस्था मात्र दयनीय झाली आहे. सुरक्षेच्या आणि व्याघ्रगणनेच्या दृष्टीने येथे उभारण्यात आलेल्या मचाणींची अवस्था दयनीय झाल्याचे वास्तव आहे. बोर व्याघ्र प्रकल्पात वन्य प्राण्यांची निगराणी करण्याकरिता तयार करण्यात आलेल्या मचाणीची अवस्था सध्या भंगारासारखी झाली आहे. एवढेच नव्हे तर बोरधरणाच्या परिसरात व धरणाच्या भिंतीशेजारी प्लास्टिकचा खच पडलेला दिसून येतो. एवढेच नव्हे तर राम मंदिराच्या पायथ्याशी धरणावर मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे धरणाच्या सौंदर्यीकरणाचे पूर्णत: वाभाडे निघाले आहे. या गाळात प्लाटिक पन्नी आणि टिस्पोजेबल ग्लासेसचा थर पाहावयास मिळत आहे. वन्य प्राणी नियमित या भागात पाणी पिण्याकरिता येतात. याच ठिकाणी वाघाचे वास्तव्य असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्लास्टिकचा वन्य प्राण्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. वन्यप्राण्यांवर निगरानी ठेवण्यासाठी येथे राम मंदिराशेजारी मोठे मचाणी उभारण्यात आल्या आहे. मात्र या मचाणीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्याच्या फळ्या इतरत्र विखुरलेल्या दिसतात. अशाही अवस्थेत या मचानावर पर्यटक चढतात. त्यामुळे त्यांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे. अभयारण्यात सुरक्षेच्या दृष्टीने कडेकोट बंदोबस्त असणे गरजेचे आहे. परंतु वन्य अधिकारी व कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने वनविभागाच्या संपदेवर चोरटे ताव मारून मोठ्या प्रमाणात वनसंपदा चोरून नेतात. काहीच दिवसांपूर्वी जिल्ह्यात वन्यजीव सप्ताह राबविण्यात आला. मोठमोठे कार्यक्रम घेण्यात आले. रॅली काढण्यात आली. चित्रांद्वारे पर्यावरण वाचवा असा संदेशही देण्यात आला. परंतु अभयारण्यातील वास्तव स्थितीकडे मात्र कानाडोळा केला जात आहे. मचाणींची स्थिती दयनीय झाल्याने त्यावर चढून अधिकारी अभयारण्याची आणि वन्यप्राण्यांची किती पाहणी करतात हे न उलगडणारे कोडेच आहे.(तालुका प्रतिनिधी)