शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकाचे पद वाचविण्यासाठी दाखविले बोगस विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 06:00 IST

शहरालगतच्या सावंगी (मेघे) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीपर्यंत वर्ग आहेत. या शाळेच्या मुख्याध्यापिका मृणालीनी पखाले यांनी २०१८-१९ च्या शैक्षणिक सत्रामध्ये स्वत: चे व एका सहाय्यक शिक्षकाचे पद वाचविण्यासाठी ३० सप्टेंबर २०१८ च्या संच मान्यतेकरिता तब्बल ४१ बोगस विद्यार्थ्यांची दाखलखारीजवर नोंद केली.

ठळक मुद्देकारवाई शून्य : सावंगी (मेघे) च्या जि.प. उच्च प्राथमिक शाळेतील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दरवर्षी ३० सप्टेंबरपर्यंतच्या संच मान्यतेनुसार शाळांना शिक्षकांची पदे मंजूर केली जाते. त्यामुळे शाळेतील अतिरिक्त ठरणाऱ्या सहायक शिक्षकासह मुख्याध्यापकाचे पद वाचविण्यासाठी तब्बल ४१ विद्यार्थी बोगस दाखविले. त्यामुळे पटसंख्या नसतानाही हे दोन्ही पदे कार्यरत असल्याचा धक्कादायक प्रकार सावंगी (मेघे) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत सुरु घडल्याचे उघडकीस आले आहे. मात्र, याकडे शिक्षण विभागाचा कानाडोळा होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.शहरालगतच्या सावंगी (मेघे) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीपर्यंत वर्ग आहेत. या शाळेच्या मुख्याध्यापिका मृणालीनी पखाले यांनी २०१८-१९ च्या शैक्षणिक सत्रामध्ये स्वत: चे व एका सहाय्यक शिक्षकाचे पद वाचविण्यासाठी ३० सप्टेंबर २०१८ च्या संच मान्यतेकरिता तब्बल ४१ बोगस विद्यार्थ्यांची दाखलखारीजवर नोंद केली. त्यामुळे ३० सप्टेंबर २०१८ च्या संच मान्यतेत या शाळेतील पटसंख्या १४५ वर पोहोचली.या पटसंख्येनुसार शाळेतील कोणतेही शिक्षक अतिरिक्त ठरले नाही. मात्र संचमान्यतेनंतर लगेचच या ४१ विद्यार्थ्यांना दाखले देऊन कमीही करण्यात आले. पण, यासंदर्भात शिक्षण विभागाला कोणतीही माहिती दिली नाही. या बोगस विद्यार्थ्यांना दाखले दिल्यानंतर शाळेती पटसंख्या केवळ १०४ वर आली आहे. याच बनावट विद्यार्थ्यांच्या आधारे मुख्याध्यापक व सहायक शिक्षक नियमानुसार अतिरिक्त असतानाही वर्षभरापासून शासनाचे वेतन घेत आहे. याची माहिती पंचायत समिती शिक्षण विभागाला असूनही शिक्षण विभागाने डोळे मिटल्यामुळे कुठे तरी पाणी मुरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या गंभीर प्रकाराकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. याबाबत माहिती जाणून घेण्याकरिता पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी धनराज तायडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.वर्षिक तपासणीत झाला होता खुलासासावंगी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष खिराळे यांनी ३ एप्रिल २०१८ रोजी वार्षिक तपासणी केली होती. यावेळी त्यांनी वर्ग १ ते वर्ग ७ पर्यंत सर्व वर्गाची तपासणी केली असता या शाळेतील उपस्थित पटसंख्या आणि शिक्षकांची मंजुरपदे याबाबत तफावत दिसून आली होती. इतकेच नाही तर संचमान्यतेपूर्वी वाढविलेले ४१ विद्यार्थी नंतर कमी झाल्याचे दिसून आले. पण, ते विद्यार्थी कोणत्या शाळेत गेले याची माहिती मुख्याध्यापकांना व शिक्षकांना नव्हती. असेही त्यावेळी तयार केलेल्या अहवालात नमुद करण्यात आले होते. मात्र, वर्ष लोटूनही शिक्षण विभागाकडून कारवाई केली गेली नाही. यामुळे याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Schoolशाळाfraudधोकेबाजी