जवाहरलाल दर्डा जयंतीनिमित्त गुरूवारी होणार रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 05:00 AM2020-06-30T05:00:00+5:302020-06-30T05:00:20+5:30

रक्ताचा एक थेंब एखाद्या व्यक्तीला जीवदान देऊ शकते. इतकेच नव्हे तर सध्याच्या कोरोना संकटात नागरिकांनीही स्वत: पुढे येत रक्तदान करावे, असे आवाहन समाजातील सर्वच स्थरातून केले जात आहे. परिणामी, रक्ताच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व ओळखून लोकमत परिवार, माजी सैनिक संघटना, प्रहार, युवा सोशल फोरम तसेच युवा परिवर्तन की आवाज या सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Blood donation camp to be held on Thursday on the occasion of Jawaharlal Darda Jayanti | जवाहरलाल दर्डा जयंतीनिमित्त गुरूवारी होणार रक्तदान शिबिर

जवाहरलाल दर्डा जयंतीनिमित्त गुरूवारी होणार रक्तदान शिबिर

googlenewsNext
ठळक मुद्देलोकमतसह विविध सामाजिक संघटनांचा संयुक्त उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : रक्तदान हेच श्रेष्ठदान असून प्रत्येक गरजूला वेळीच रक्त उपलब्ध व्हावे या हेतूने लोकमतचे संस्थापक तथा जेष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीचे औचित्य साधून लोकमत परिवार आणि विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी २ जुलैला सकाळी १० ते दुपारी १ या कालावधीत स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रक्ताचा एक थेंब एखाद्या व्यक्तीला जीवदान देऊ शकते. इतकेच नव्हे तर सध्याच्या कोरोना संकटात नागरिकांनीही स्वत: पुढे येत रक्तदान करावे, असे आवाहन समाजातील सर्वच स्थरातून केले जात आहे. परिणामी, रक्ताच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व ओळखून लोकमत परिवार, माजी सैनिक संघटना, प्रहार, युवा सोशल फोरम तसेच युवा परिवर्तन की आवाज या सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीची चमू रक्तसंकलन करणार असून रक्तदात्यांनीही या शिबिरात सहभागी होऊन मोठ्या संख्येने रक्तदान करावे, असे आवाहन लोकमत परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.

Web Title: Blood donation camp to be held on Thursday on the occasion of Jawaharlal Darda Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.