शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

महिलेची घरीच प्रसूती

By admin | Updated: May 22, 2015 02:21 IST

गभर्वती महिलांकरिता शासनाच्यावतीने विविध योजना अस्तित्त्वात आणल्या आहेत.

आरोग्य सेवा कुचकामी : शासकीय योजना कागदावरच शालिक सावसाकडे कोरागभर्वती महिलांकरिता शासनाच्यावतीने विविध योजना अस्तित्त्वात आणल्या आहेत. त्याची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना आहे. यावर कोट्यवधी रुपये खर्च होत असताना जिल्ह्यातील दुर्गम भागातील महिलांना मात्र याचा लाभ होत नसल्याचे दिसून आले आहे. समुद्रपूर तालुक्याच्या एका कोपऱ्यात असलेल्या कोरा या गावात रुग्णालयाची सुविधा असताना घरीच प्रसूती करण्याची वेळ महिलेवर आल्याने जिल्ह्यातील आरोग्य सेवा कुचकामी ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे. कोरा येथील गर्भवती महिला अर्चना मारबते ही गावातील आरोग्य केंद्रात उपचार घेत होती. मंगळवारी रात्री अनाचक तिला प्रसवकळा आल्याने तिच्या कुटुंबीयांनी आरोग्य केंद्रात नेले; मात्र गावातील दोनही आरोग्य केंद्र कुलूपबंद होते. यामुळे तिच्या कुटुंबीयांनी इतरत्र धावपळ केली असता त्यांना आरोग्य सेवेत असलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्याची मदत मिळाली नाही. यामुळे त्यांनी तिला नाईलाजास्तव घरी परत आणले. तिच्या प्रसवकळा वाढतच होत्या. त्या असह्य होत असल्याने कुटुंबीयांनी अखेर गावातील ‘सूईन’ला बोलावून आणले. गावातील या अप्रशिक्षित महिलेकडून अर्चनाची प्रसूती करण्यात आली. या प्रकारात आई व बाळाची प्रकृती ठिक असल्याने यात कुठलाही धोका झाला नाही. जर यात बाळाला व त्याच्या आईला काही धोका उद्भवला असता तर त्याची जबादारी कुणाची, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. कोरा येथे एक नाही तर शासनाची दोन आरोग्य केंद्रे आहेत. यातील एक आयुर्वेदिक व दुसरे अ‍ॅलोपॅथिक सेवा देणारे आहे. अर्चनाच्या प्रसवकळा वाढत असल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिला या दोनही आरोग्य केंद्रात नेले; मात्र दोनही ठिकाणी कुलूप होते. आरोग्य सेवा पुरविण्याकरिता लाखो रुपये खर्च करून उभारलेली ही सुविधा जर वेळीच उपयोगी ठरत नसेल तर त्याचा उपयोग काय असा सवाल येथील नागरिकांनी केला आहे. अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचा शासनाचा दंडक आहे. असे असताना येथे मात्र या नियमांना तिलांजली दिल्याचे समोर आले आहे. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कोरा येथील नागरिक करीत आहेत.