शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सुगंधित तंबाखूच्या कारवाईतून भांगेच्या गोळ्या बेपत्ता

By admin | Updated: January 31, 2015 23:24 IST

सुगंधित तंबाखूच्या कारवाईत देवळीतील तीन दुकानदारांकडून पावणेसात लाखांचा माल जप्त करण्यात आला; मात्र या कारवाईत आर्थिक व्यवहार झाल्याची बोंब देवळीत सुरू आहे. कारवाई करताना

दुकानदार व अधिकाऱ्यांचे साटेलोटे ? : बाहेर फेकलेल्या गोळ्या नागरिकांच्या हाती हरिदास ढोक - देवळीसुगंधित तंबाखूच्या कारवाईत देवळीतील तीन दुकानदारांकडून पावणेसात लाखांचा माल जप्त करण्यात आला; मात्र या कारवाईत आर्थिक व्यवहार झाल्याची बोंब देवळीत सुरू आहे. कारवाई करताना अन्न व औषधी प्रशासन तथा पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथे सापडलेल्या भांगेच्या गोळ्या फेकल्याचा आरोप शहरवासी करीत आहेत. त्या गोळ्या काही शहरवासीयांच्या हाती लागल्या आहेत. यामुळे शहरात चांगलाच गोंधळ उडाला आहे. पोलिसांच्या दारूबंदी विशेष पथकाला येथे मोठ्या प्रमाणात सुगंधीत तंबाखू असल्याची माहिती मिळाली. यावरून त्यांनी अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत ही कारवाई केली; परंतु या कारवाई दरम्यान एका किराणा दुकानदाराने भांगेच्या गोळ्या असलेला डब्बा दुकानाच्या खिडकीतून बाहेर फेकल्याचे बोलले जात आहे. तर दुकानात सापडलेला उर्वरीत माल विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्तीत दाखविला नसल्याचा आरोप आहे. दुकानदाराने खिडकीतून बाहेर फेकलेल्या भांगेच्या गोळ्या नागरिकांच्या हाती लागल्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. या कारवाईत काही किराणा दुकानदारांना अन्न व औषधी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आधीच सूचना देवून अभय दिल्याचीही चर्चा आहे. शहरातील अनेक दुकानात सुगंधीत तंबाखू व मादक पदार्थाची खुलेआम विक्री होत असून याकडे अन्न व औषधी प्रशासन विभागाची डोळेझाक होती. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या दारूबंदी विशेष पथकाने ही बाब उजेडात आणून कारवाईचा बडगा उगारला. यावेळी दोन दुकानदारांनी पोलिसांना आमिष दिले. यात पोलीस उपनिरीक्षक गजानन जाधव यांनी या दुकानदारांना चांगलाच चोप दिल्याची माहिती आहे; परंतु अन्न प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही संपूर्ण कारवाई सहज घेत शंकेला वाव दिला. या संपूर्ण प्रकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होवून भांगेच्या गोळ्याची कारवाई टाळल्याची खमंग चर्चा आहे. याप्रकरणी वरिष्ठांनी लक्ष घालून खरा प्रकार उघडकीस आणावा, अशी शहरवासीयांची मागणी आहे.