शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिकेच्या सेवांचा ऑनलाईन घेता येणार लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 06:00 IST

महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्यावतीने एका प्रकल्पांतर्गत नगरपालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या मालमत्ता करसंबंधी १२ सेवा, पाणीपुरवठा संबंधी १४ सेवा, ना हरकत प्रमाणपत्रासंबंधी २ सेवा आणि व्यापार परवान्यासंबंधी १० सेवा सद्यस्थितीत ‘आपले सरकार महाऑनलाईन’ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहे.

ठळक मुद्देवेळेची बचत : कामकाज होणार गतिमान, पारदर्शकतेसाठी प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील नागरिकांना पालिकेकडून विविध प्रमाणपत्र मिळविण्यासाठी किंवा कराचा भरणा करण्यासाठी पालिकेत जावे लागते. त्यामुळे नगरपालिकेत गर्दी होऊन अनेकांचा वेळ वाया जातो. नागरिकांच्या वेळेच्या बचतीसह तत्काळ सेवा मिळण्याकरिता ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेमुळे कामात गती आणि पारदर्शकताही निर्माण होणार आहे.महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्यावतीने एका प्रकल्पांतर्गत नगरपालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या मालमत्ता करसंबंधी १२ सेवा, पाणीपुरवठा संबंधी १४ सेवा, ना हरकत प्रमाणपत्रासंबंधी २ सेवा आणि व्यापार परवान्यासंबंधी १० सेवा सद्यस्थितीत ‘आपले सरकार महाऑनलाईन’ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. त्यामुळे नागरिकांनी या संकेतस्थळाला भेट देऊन घरबसल्या किंवा जवळच्या ई-सेवा केंद्रात जाऊन या सुविधांचा लाभ घेता येणार आहे.नागरिकांना ऑनलाईन अर्ज करण्यासह कर भरणा करण्याचीही सुविधा असल्याने आता नगरपालिकेत येऊन चकरा मारण्याची गरज भासणार नाही. परिणामी, पालिका कार्यालयात नागरिकांची गर्दीही वाढणार नाही. आॅनलाईन अर्ज केल्यानंतर ठराविक मुदतीत प्रमाणपत्र देणे हे पालिकेला बंधनकारक राहणार आहे.त्यामुळे नगरपालिका प्रशासनाचीही आता जबाबदारी वाढली आहे. या सुविधांचा वर्धेकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष अतुल तराळे, उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर व मुख्याधिकारी प्रदीप जगताप यांनी केले आहे. तसेच यामध्ये काही अडचणी किंवा तक्रारी असल्यास नागरिकांना लगेच माहिती देण्यासही सांगितले आहे.नागरिकांना विविध कागदपत्रे मिळणे सुलभनगरपालिकेत विविध प्रकारची कागदपत्रे, नाहरकत प्रमाणपत्र मिळविताना मोठी अडचण होत होती. यात नागरिकांच्या वेळ आणि पैशाचाही अपव्यय होत होता. एकाच कामाकरिता सातत्याने येरझारा कराव्या लगत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. एवढे करूनही अनेकांची वेळीच कामे होत नव्हती. नगराध्यक्षांनी ही बाब लक्षात घेऊन ऑनलाईन सुविधा उपलब्ध केल्याने नागरिकांचा आता त्रास बंद होणार असून कागदपत्रे मिळणे सुलभ होणार आहे. पालिकेच्या कामालाही गती मिळणार आहे.

टॅग्स :onlineऑनलाइन