शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

इंटरनेटवर वैयक्तिक माहिती अपलोड करताना काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 06:00 IST

उपविभागीय पोलीस अधिकारी जगताप पुढे म्हणाले, जबाबदार नेटीझन्स तयार करण्यासाठी जागरूकता हा एक महत्त्वाचा पैलू असून या मोहिमेमुळे महिला आणि मुलांना सुरंक्षित सायबर पद्धतीविषयी माहिती मिळेल, असे ते म्हणाले. यावेळी ठाणेदार महेंद्र इंगळे यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून बदलत्या गुन्हेगारीचे स्वरूप आणि फसवणुकीबाबत माहिती दिली.

ठळक मुद्देसंडे अँकर । पीयूष जगताप, ‘सायबर सेफ वुमेन’ मोहिमेचा प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : डिजिटल युगात इंटरनेटचा दैनंदिन जीवनात मोठ्याप्रमाणात वापर होत आहे. इंटरनेट हे उत्तम साधन असले तरीही आपण इंटरनेटवर अपलोड करीत असलेल्या वैयक्तिक माहितीचा दुरुपयोग करून फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. इंटरनेटवर वैयक्तिक माहिती अपलोड करताना सुरक्षाविषयक काळजी घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी केले.सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सायबर सेफ वुमन मोहिमेंतर्गत आशीर्वाद मंगल कार्यालयात पोलीस विभाग, जिल्हा माहिती कार्यालय, शैक्षणिक संस्थांच्या वतीने संयुक्तरीत्या महिलांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू, माहिती अधिकारी मनीषा सावळे, सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मेघाली गांवडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर, प्रकाश खंडार, अमर लाखे यांची उपस्थिती होती.उपविभागीय पोलीस अधिकारी जगताप पुढे म्हणाले, जबाबदार नेटीझन्स तयार करण्यासाठी जागरूकता हा एक महत्त्वाचा पैलू असून या मोहिमेमुळे महिला आणि मुलांना सुरंक्षित सायबर पद्धतीविषयी माहिती मिळेल, असे ते म्हणाले. यावेळी ठाणेदार महेंद्र इंगळे यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून बदलत्या गुन्हेगारीचे स्वरूप आणि फसवणुकीबाबत माहिती दिली. बँक खात्याशी संबंधित एटीएम पिन, ओटीपी, सीव्हीव्ही नंबर कुणालाही देऊ नये, नोकरीचे प्रलोभन, लॉटरी, एखादी वस्तू कमी किमती उपलब्ध करून देणे, विवाहविषयक साईटवरील प्रलोभने आदींच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहेत. अशी माहिती देणारे फोन, एसएमएस किंवा ई-मेल आल्यास त्याची माहिती तत्काळ सायबर सेलकडे द्यावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाला बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर, दक्षता समितीचे नीलेश खंडारे, लॉयन्स क्लबचे पदाधिकारी, माध्यम प्रतिनिधी, महाविद्यालय, शाळांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, सामाजिक कार्यकर्ते व पोलीस मित्र उपस्थित होते. संचालन मारोती नगराळे यांनी केले.देवळी येथील भोंग सभागृहात कार्यशाळा घेण्यात आली. अतिथी म्हणून खासदार रामदास तडस, उपविभागीय पोलीस अधिकारी तृृप्ती जाधव, सहा़यक पोलीस निरीक्षक नितीन लेवरकर, सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, नगराध्यक्ष सुचिता मडावी, उपाध्यक्ष नरेंद्र मदनकर, नगरसेविका बकाणे, ताडाम, अंगणवाडी सेविका, प्रतिष्ठित नागरिक, शाळा व महाविद्यालयातील प्राचार्य, पोलीस मित्रासह साडेचारशे विद्यार्थी उपस्थित होते.संचालन प्रा. प्रशांत कुमरे यांनी केले़ कार्यशाळा आयोजनाकरिता सायबर सेलचे कर्मचारी दिनेश बोथकर, नीलेश कट्टोजवार, अनुप कावळे, अक्षय राऊत यांनी सहकार्य केले.

टॅग्स :PoliceपोलिसInternetइंटरनेट