शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

केळीच्या दरात प्रतिक्विंटल सहाशे रुपयांची घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 05:00 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांनी मार्च २०१९ मध्ये उन्हाचे चटके सहन करीत केळीची लागवड केली. वर्षभर या पिकाचे संगोपण केल्यानंतर आता केळीचे घड तोडणीवर आले आहे. बारा महिन्यात केळीचे घड तोडायला येतात त्यामुळे या उन्हाळ्यात शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा होती. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिराश झाला. कोरोना आजारापूर्वी कच्च्या केळीला प्रतिक्विंटल १ हजार रुपये दर होता. मात्र संचारबंदीनंतर हा दर ४०० रुपयांवर आला आहे. त्यामुळे या दरात वर्षभर लागलेला खर्चही भरुन निघणार नसल्याचे केळी उत्पादकांकडून सांगण्यात आले आहे. कोरोनाच्या संसर्गाच्या भितीने बाजारपेठ बंद आहे

ठळक मुद्देकोरोनाचा फटका । शेतकरी विवंचनेत, कमी दरातही शेतमाल विकण्याची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जाते. गेल्यावर्षीच्या उन्हाळ्यात शेतकऱ्यांनी मेहनतीने केळीची लागवड केली. यावर्षी केळीचे चांगले पीक आलेल असताना आता संचारबंदीमुळे केळीची तोडणी थांबली आहे. अशातच क्विंटलमागे सहाशे रुपये कमी दरात केळी विकावी लागत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांनी मार्च २०१९ मध्ये उन्हाचे चटके सहन करीत केळीची लागवड केली. वर्षभर या पिकाचे संगोपण केल्यानंतर आता केळीचे घड तोडणीवर आले आहे. बारा महिन्यात केळीचे घड तोडायला येतात त्यामुळे या उन्हाळ्यात शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा होती. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिराश झाला. कोरोना आजारापूर्वी कच्च्या केळीला प्रतिक्विंटल १ हजार रुपये दर होता. मात्र संचारबंदीनंतर हा दर ४०० रुपयांवर आला आहे. त्यामुळे या दरात वर्षभर लागलेला खर्चही भरुन निघणार नसल्याचे केळी उत्पादकांकडून सांगण्यात आले आहे. कोरोनाच्या संसर्गाच्या भितीने बाजारपेठ बंद आहे. व्यवहारही पुर्णत: सुरळीत होण्यास बराच कालावधी लागणार आहे. सध्या केळीच्या बागा कटाईवर आल्या आहेत. बगिच्या जास्त दिवस तसाच ठेवला तर पुर्णत: हातून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाईलाजास्तव कमी दरातही केळी विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.चांगल्या उत्पन्नाच्या अपेक्षेने वर्षभर मेहनत करुन केळीची बाग फुलविली. परिश्रमाचे फळ मिळत केळीच्या बगीच्यात चांगले घड पकडले आहे. केळीची ही बाग पाहून आशाही पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, कोरोनाच्या प्रभावाने क्विंटलमागे सहाशे रुपयाचे भाव पडले आहे. त्यामुळे मातीमोल किंमतीत केळी विकावी लागत आहे. यातून लागलेला खर्चही भरुन निघत नसल्याने नुकसानीचा सामना करावा लागत आहे.कुणाल बोबडे, केळी उत्पादकमार्च महिन्यात केळीला चांगला दर मिळतो. त्यामुळे मार्च २०१९ ला केळीची लागवड केली. मात्र सध्या तेजी ऐवजी मंदी आली आहे. १ हजार रूपये क्विंटलची कच्ची केळी चारशे रुपयात विकण्याची वेळ आली आहे.अभिजीत तितरे, केळी उत्पादक, वडगाव (कला)

टॅग्स :Socialसामाजिक