केळीच्या दरात प्रतिक्विंटल सहाशे रुपयांची घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 05:00 AM2020-04-05T05:00:00+5:302020-04-05T05:00:45+5:30

तालुक्यातील शेतकऱ्यांनी मार्च २०१९ मध्ये उन्हाचे चटके सहन करीत केळीची लागवड केली. वर्षभर या पिकाचे संगोपण केल्यानंतर आता केळीचे घड तोडणीवर आले आहे. बारा महिन्यात केळीचे घड तोडायला येतात त्यामुळे या उन्हाळ्यात शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा होती. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिराश झाला. कोरोना आजारापूर्वी कच्च्या केळीला प्रतिक्विंटल १ हजार रुपये दर होता. मात्र संचारबंदीनंतर हा दर ४०० रुपयांवर आला आहे. त्यामुळे या दरात वर्षभर लागलेला खर्चही भरुन निघणार नसल्याचे केळी उत्पादकांकडून सांगण्यात आले आहे. कोरोनाच्या संसर्गाच्या भितीने बाजारपेठ बंद आहे

Banana prices fall by Rs 600 per barrel | केळीच्या दरात प्रतिक्विंटल सहाशे रुपयांची घसरण

केळीच्या दरात प्रतिक्विंटल सहाशे रुपयांची घसरण

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाचा फटका । शेतकरी विवंचनेत, कमी दरातही शेतमाल विकण्याची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जाते. गेल्यावर्षीच्या उन्हाळ्यात शेतकऱ्यांनी मेहनतीने केळीची लागवड केली. यावर्षी केळीचे चांगले पीक आलेल असताना आता संचारबंदीमुळे केळीची तोडणी थांबली आहे. अशातच क्विंटलमागे सहाशे रुपये कमी दरात केळी विकावी लागत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी मार्च २०१९ मध्ये उन्हाचे चटके सहन करीत केळीची लागवड केली. वर्षभर या पिकाचे संगोपण केल्यानंतर आता केळीचे घड तोडणीवर आले आहे. बारा महिन्यात केळीचे घड तोडायला येतात त्यामुळे या उन्हाळ्यात शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा होती. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिराश झाला. कोरोना आजारापूर्वी कच्च्या केळीला प्रतिक्विंटल १ हजार रुपये दर होता. मात्र संचारबंदीनंतर हा दर ४०० रुपयांवर आला आहे. त्यामुळे या दरात वर्षभर लागलेला खर्चही भरुन निघणार नसल्याचे केळी उत्पादकांकडून सांगण्यात आले आहे. कोरोनाच्या संसर्गाच्या भितीने बाजारपेठ बंद आहे. व्यवहारही पुर्णत: सुरळीत होण्यास बराच कालावधी लागणार आहे. सध्या केळीच्या बागा कटाईवर आल्या आहेत. बगिच्या जास्त दिवस तसाच ठेवला तर पुर्णत: हातून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाईलाजास्तव कमी दरातही केळी विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

चांगल्या उत्पन्नाच्या अपेक्षेने वर्षभर मेहनत करुन केळीची बाग फुलविली. परिश्रमाचे फळ मिळत केळीच्या बगीच्यात चांगले घड पकडले आहे. केळीची ही बाग पाहून आशाही पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, कोरोनाच्या प्रभावाने क्विंटलमागे सहाशे रुपयाचे भाव पडले आहे. त्यामुळे मातीमोल किंमतीत केळी विकावी लागत आहे. यातून लागलेला खर्चही भरुन निघत नसल्याने नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
कुणाल बोबडे, केळी उत्पादक

मार्च महिन्यात केळीला चांगला दर मिळतो. त्यामुळे मार्च २०१९ ला केळीची लागवड केली. मात्र सध्या तेजी ऐवजी मंदी आली आहे. १ हजार रूपये क्विंटलची कच्ची केळी चारशे रुपयात विकण्याची वेळ आली आहे.
अभिजीत तितरे, केळी उत्पादक, वडगाव (कला)

Web Title: Banana prices fall by Rs 600 per barrel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.