शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

सेलूच्या मध्यवर्ती सहकारी बँकेची शिल्लक१ रुपया ९३ पैसे

By admin | Updated: May 15, 2014 01:48 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक स्थिती सर्वांनाच माहिती आहे. एकेकाळी शेतकरी व कर्मचार्‍यांची विश्‍वासाची असलेली ही जिल्हा बँक पूर्णत: डबघाईस आली आहे.

सेलू : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक स्थिती सर्वांनाच माहिती आहे. एकेकाळी शेतकरी व कर्मचार्‍यांची विश्‍वासाची असलेली ही जिल्हा बँक पूर्णत: डबघाईस आली आहे. या बँकेच्या सेलू शाखेत आजच्या घडीला असेलेली शिल्लक अवाक् करणारी आहे. या बँकेच्या तिजोरीमध्ये तीन दिवस केवळ १ रुपया ९३ पैसे एवढी रक्कम शिल्लक असल्याचे समोर आले आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक डबघाईस आली आहे. बँकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. ११ मे रोजी एक खातेदार आत्यंतिक आर्थिक अडचणीमुळे बँकेत ५00 रुपयांचा विड्राल करायला गेला. तेथील कर्मचार्‍यांनी त्याच्या अडचणीत मदत करू शकत नसल्याबाबत खेद व्यक्त केला. एवढेच नव्हे तर बँकेच्या तिजोरीत केवळ १ रुपया ९३ पैसे एवढी रक्कम शिल्लक असल्याचे सांगितले. हे ऐकताच खातेदाराला भोवळच आली. शेतकरी, कर्मचार्‍यांनी कष्टाचे पैसे विश्‍वासाने येथे ठेवले. अडचणीच्या वेळी कधीही रक्कम काढू शकतो, ही भोळी आशा आज सर्व खातेदारांच्या जीवावर उठली आहे. बँकेचे कर्जदार कर्जफेड करीत नसल्याने पैसा येणार कुठूण, असा प्रतिप्रश्न बँकेचे कर्मचारी खातेदाराला विचारताना दिसतात.कर्जदाराकडून वसूल झालेल्या रकमेतून अडलेल्या खातेदाराचे विड्राल देणे अपेक्षित आहे; पण बँक या वसुलीतून कर्मचार्‍यांचे वेतन नियमित करीत आहे. केवळ एक महिन्याचे वेतन तेवढे थकित आहे. बँक डबघाईस आली आणि खातेदार अडले. त्यांना गरजेच्या वेळी पैसा नाही. कर्मचार्‍यांना मात्र पगार मिळतो. बँक बुडाली तरी खातेदार मरतील. खातेदराचे बँकेत पैसे असताना आजारपण, लग्नकार्य, मुलांचे शिक्षण, शेती या कामी येत नाही. पैसा असून घरात किराणा वेळेवर येत नाही. कोरडी, ओली भाकर खाऊन तो चिंताग्रस्त असून त्याला झोप लागत नाही. बँकेमुळे खातेदारच अर्धमेला झाल्याचे दिसते.सेलू शाखेप्रमाणेच इतर शाखांची स्थिती असून तेथेही हेच वास्तव आहे. बँकेत आता संचालक मंडळ नाही. प्रशासकाकडे बँकेचा कारभार आहे. बँकेत आता शेतकर्‍यांचा कुणीच वाली उरला नाही. आता कुणाच्या तोंडाकडे पाहावे, असा प्रश्न खातेदार, शेतकर्‍यांसमोर उभा ठाकला आहे. (तालुका प्रतिनिधी)