शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पशुपक्ष्यांच्या हालचालीवर बळीराजाचे लक्ष

By admin | Updated: May 25, 2015 02:08 IST

सध्या मे हिटच्या तडाख्यात सापडलेल्या जीवसृष्टीला पावसाची प्रतीक्षा आहे. मृग नक्षत्रापासून पावसाला प्रारंभ होतो.

वर्धा : सध्या मे हिटच्या तडाख्यात सापडलेल्या जीवसृष्टीला पावसाची प्रतीक्षा आहे. मृग नक्षत्रापासून पावसाला प्रारंभ होतो. पण पक्षी महिन्याच्या मध्यानंतरच पावसापासून बचाव करण्यासाठी झाडावर आपली घरटी बांधण्याच्या तयारीला लागतात. पक्ष्यांची घरटी बांधण्याची वेळ आणि पद्धती यावरून पावसाचा अंदाज फार पूर्वीपासून शेतकरी घेत असतात. त्यामुळे पक्ष्यांचे घरटे आणि हालचालींवर बळेरेराजा लक्ष ठेवून आहे. शेतकरी शेतीच्या मशागतीसोबतच पशुपक्ष्यांच्या हालचालीवर नेहमीच बारीक लक्ष ठेऊन असतो. त्यांच्या हालचालीवरुन पावसाचा आणि एकंदरीतच निसर्गाचा अंदाज बांधला जातो. त्यातील बहुतांश अंदाज अचूक ठरत असल्याचे शेतकरी सांगतात. टिटवी पक्ष्याने नदीनाल्याच्या काठापासून अंडी दूर ठेवली, तसेच कावळ्यांनी आपली घरटी झाडाच्या मध्यावर बांधली तर पावसाळा जास्त होईल, असे संकेत असतात. सध्या पक्ष्यांनी घरटे बांधण्याची लगबग सुरू केली असून, निवारा व अंडी ठेवण्याची व्यवस्था केल्या जात आहे. घरट्याच्या उंचीवरून पाऊस किती येईल याचा अंदाज बांधला जातो.कावळ्याच्या घरटी बांधण्याच्या हालचाली हा पावसाच्या आगमनाचा शुभ संकेत समजल्या जातो. कावळ्याने घरटे झाडाच्या शेंड्यावर बांधल्यास पावसाळा असमाधानकारक, मध्यभागी तयार केल्यास पाऊस समाधानकारक समजण्यात येतो. यासोबतच निंबाच्या झाडांना जास्त प्रमाणात निंबोळ्या लागल्या तर हंगाम चांगला येईल, असा तर्कही अनुभवी शेतकरी देतात. तसेच सुरगण हा पक्षी घरटी बांधण्यात तरबेज असतो. त्याने जर भरपूर घरटी बांधली तर पाऊस जास्त येईल असे समजले जाते. पक्ष्यांना वातावरणाचा अंदाज दूरवरून येत असतो. परंतु शेताभोवतालची झाडेच सध्या तोडल्या जात असल्याने शेतशिवारात पक्ष्यांची घरटी पाहायला मिळणे दुरापास्त झाले आहे.(शहर प्रतिनिधी)