वाहतुकीच्या समस्येने आर्वीकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 06:00 AM2020-01-17T06:00:00+5:302020-01-17T06:00:19+5:30

छत्रपती शिवाजी चौकापासून गांधी चौकाकडे जाताना प्रश्न पडतो की, डावीकडून जावे की उजवीकडून. कारण रस्त्याच्या डाव्या बाजूला चौकातच रिक्षा, दुकानासमोर उभी असणारी वाहने यामुळे डाव्या बाजूला रस्ता असूनही रस्ता नसल्यासारखी स्थिती आहे. शिवाजी चौक ते गांधी चौक या रस्त्यावरील दुतर्फा असलेल्या दुकानांसमोर वाहने उभे केली जात असल्याने वाहने चालविणे व पायी चालणेसुद्धा कठीण झाले आहे. शिवाजी चौकाकडून देऊरवाडाकडे जाणाऱ्या रस्त्याची दैना झाली आहे.

Arvikar suffers from traffic problems | वाहतुकीच्या समस्येने आर्वीकर त्रस्त

वाहतुकीच्या समस्येने आर्वीकर त्रस्त

Next
ठळक मुद्देरस्त्यांना अतिक्रमणाचा विळखा : नगरपालिका, पोलीस विभागाने लक्ष देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : शहरात वाहनांची वाढती संख्या, रस्त्यांची स्थिती, अतिक्रमण, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन, वाहन चालकांचा निष्काळजीपणा, वाहनतळाचा अभाव आदी कारणांमुळे शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून अपघाताच्या घटनांत वाढ होत आहे.
छत्रपती शिवाजी चौकापासून गांधी चौकाकडे जाताना प्रश्न पडतो की, डावीकडून जावे की उजवीकडून. कारण रस्त्याच्या डाव्या बाजूला चौकातच रिक्षा, दुकानासमोर उभी असणारी वाहने यामुळे डाव्या बाजूला रस्ता असूनही रस्ता नसल्यासारखी स्थिती आहे. शिवाजी चौक ते गांधी चौक या रस्त्यावरील दुतर्फा असलेल्या दुकानांसमोर वाहने उभे केली जात असल्याने वाहने चालविणे व पायी चालणेसुद्धा कठीण झाले आहे. शिवाजी चौकाकडून देऊरवाडाकडे जाणाऱ्या रस्त्याची दैना झाली आहे. अप्पर वर्धा कॉलनी ते मॉडेल हायस्कूलपर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक अडथळे पार करीत वाहनधारकांना अमरावतीकडे कसेबसे जावे लागत आहे. वाहनतळाअभावी नागरिक वाटेल तेथे वाहन उभे करतात. वाहन उभे केल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो, मात्र याचा कुणीच विचार करीत नाही. मुख्य रस्त्यावर वाहन उभे करून चर्चा करणारे अनेक महाभाग शहरात आहेत.
शहरातील अनेक ठिकाणे अपघातप्रवण स्थळ झाले आहे. बसस्थानक तसेच एलआयसी कार्यालयासमोर आॅटो, काळीपिवळी व ट्रक रस्त्याच्या बाजूला उभे केले जात असल्यामुळे वसंतनगर येथून येणाºया लोकांना मुख्य रस्त्यावरून येणारे वाहन दिसत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. तसेच साईनगरकडे जाणाºया रस्त्यावर चौकातच हॉटेलसमोर उभी केली जाणारी वाहने, चौकातील गर्दी यामुळे अडचणींना सामोरे जावे लागते. तरूणांच्या गर्दीमुळे शासकीय विश्राम गृहासमोरसुद्धा बेशिस्त वाहनांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. शहरातील वाहतूक सुरळीत कशी करता येईल व वाहतुकीच्या समस्या कशी सोडविता येईल याचा विचार करणे गजरेचे झाले आहे. पोलीस विभाग, नगरपालिका व प्रशासनाने उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे.

Web Title: Arvikar suffers from traffic problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.