आर्वी तालुका कोरोनाचा नवा ‘हॉटस्पॉट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 05:00 AM2020-07-15T05:00:00+5:302020-07-15T05:00:27+5:30

रामदेवबाबा वॉर्डातील युवकाच्या निकट संपर्कातील १४ नमुने ११ जुलैला तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. त्यापैकी पाच नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले ५९ व ४९ वर्षीय दोन काका, ५८ व ४० वर्षीय दोन काकू आणि वीस वर्षीय युवक कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले.

Arvi Taluka Corona's new 'hotspot' | आर्वी तालुका कोरोनाचा नवा ‘हॉटस्पॉट’

आर्वी तालुका कोरोनाचा नवा ‘हॉटस्पॉट’

Next
ठळक मुद्देरामदेवबाबा वॉर्डात आढळले पाच पॉझिटिव्ह : रुग्णसंख्या पोहोचली २१ वर; एकाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/आर्वी : येथील रामदेवबाबा वॉर्डातील २३ वर्षीय युवकाचे निकट संपर्कातील पाच जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आर्वीला कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. आतापावेतो २१ जणांना कारोनाची बाधा झाली तर यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे.
रामदेवबाबा वॉर्डातील युवकाच्या निकट संपर्कातील १४ नमुने ११ जुलैला तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. त्यापैकी पाच नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले ५९ व ४९ वर्षीय दोन काका, ५८ व ४० वर्षीय दोन काकू आणि वीस वर्षीय युवक कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले.
या सर्व रुग्णांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज पावेतो एकच रुग्ण पॉझिटिव्ह होता, तर सर्वच निकट संपर्कातील व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र मंगळवारी पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दोन दिवस संचारबंदी असून रस्त्यावर निरव शांतता आहे. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन, नगरपालिका प्रशासन, महसूल विभाग सर्वतोपरी खबरदारी घेत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे व नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांनी केले आहे.

बाधित कुटुंबाच्या घराचा परिसर सील
रामदेवबाबा वॉर्डातील कोरोनाबाधित रुग्णाच्या घरासभोवतालचा परिसर सील करून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हे पाच रुग्ण आणखी कुणाच्या संपर्कात आले, याचा आरोग्य, महसूल विभागाकडून शोध घेतला जात असून सर्व संबंधित लोकांना क्वारंटाईन करण्याचे कार्य सुरू आहे.

Web Title: Arvi Taluka Corona's new 'hotspot'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.