शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य रुग्णालयात प्रथमच कृत्रिम सांधारोपण शस्त्रक्रिया

By admin | Updated: May 20, 2014 23:52 IST

कायमस्वरुपी गुडघा निकामी झाल्यानंतर रुग्णास अपंगत्व येते. अशा रुग्णांवर शस्त्रक्रियेद्वारे सांधारोपण करणे हाच एक पर्याय आहे. सांधारोपणाची शस्त्रक्रिया मुंबई नागपूरसह केवळ मोठ्या

 ंवर्धा : कायमस्वरुपी गुडघा निकामी झाल्यानंतर रुग्णास अपंगत्व येते. अशा रुग्णांवर शस्त्रक्रियेद्वारे सांधारोपण करणे हाच एक पर्याय आहे. सांधारोपणाची शस्त्रक्रिया मुंबई नागपूरसह केवळ मोठ्या शहरातच उपलब्ध आहे. वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पहिल्यांदाच टोटल हिप रिप्लेसमेंट ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली आहे. कृत्रिम सांधारोपण शस्त्रक्रिया ही अत्यंत महागडी असल्यामुळे सामान्य रुग्णांना मोठ्या शहरात जावून करणे शक्य होत नाही. सामान्य रुग्णालयातील अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. अनुपम हिवलेकर आणि डॉ. श्रीकांत इंदूरकर यांनी बधीरीकरण तज्ज्ञ डॉ. स्रेहल सोनटक्के, डॉ. आदिती शथलवर व डॉ. कुबनाने यांनी ५५ वर्ष वयाच्या दूूर्गा रामदास साहू यांच्यावर ही अवघड शस्त्रक्रिया पूर्ण केली असून रुग्ण आता सामान्यपणे चालू शकतो. कृत्रिम सांधारोपण शस्त्रक्रीयेकरिता साधारणत: एक ते दीड लक्ष रुपयांचा खर्च येतो; परंतु जिल्हा सामान्य रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेले साहित्य वगळता संपूर्ण शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली आहे. वर्ध्याच्या स्टेशन फैल भागात राहणार्‍या दूर्गा साहू यांना गुडघे दु:खीचा त्रास होत असल्यामुळे अपंगत्व आले होते. या अवघड शस्त्रक्रियेसाठी त्यांना २८ एप्रिल रोजी भरती करण्यात आले होते. त्यांच्यावर ८ मे रोजी शस्त्रक्रिया करून १९ मे रोजी सामान्य रुग्णालयात अल्प दरात यशस्वीपणे पूर्ण करून सुटी देण्यात आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथमच कृत्रिम सांधारोपन शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्याकरिता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.मिलींद सोनोने, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी अस्थिरोग तज्ज्ञ चमूला मार्गदर्शन केल्याचे कळविले आहे. (प्रतिनिधी) संधीवातामुळे व सांध्याच्या हाडांमध्ये रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे गुडघ्याचा अथवा हिप जॉइंटचा सांधा कायमस्वरुपी निकामी होतो व रुग्णांस अपंगत्व येते. अशा रुग्णांना औषधोपचाराचा फायदा होत नाही. यावर सांधारोपन करणे हा एकमेव परिणामकारक उपाय आहे. जिल्ह्यात सिकलसेलचे प्रमाण जास्त असल्यामुळे सांधादु:खीचे रुग्ण मोठ्याप्रमाणात आहेत. गरीब रुग्णांना शस्त्रक्रियेचा खर्च परवडत नसल्यामुळे कायम अपंग राहतात.