शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतागृह उभारण्यात उदासीनता

By admin | Updated: May 1, 2015 01:42 IST

गर्दीच्या ठिकाणी महिलांकरिता स्वच्छतागृहांची उपलब्धता करुन देण्यात यावी अशा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता.

वर्धा : गर्दीच्या ठिकाणी महिलांकरिता स्वच्छतागृहांची उपलब्धता करुन देण्यात यावी अशा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. मात्र पालिका प्रशासनाकडून या आदेशाचे पालन होत नसल्याचे दिसते. शहरात स्वच्छतागृह नसल्याने महिलांची कुचंबना होत आहे. याबाबत स्थानिक नगरपालिकेतील भाजपच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या समस्येकडे लक्ष वेधले आहे. शहरातील प्रमुख चौक व गर्दीच्या स्थळी स्वच्छतागृह नसल्यामुळे महिलांची कुचंबना होते. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. महिलांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध करून द्यावे आणि ती स्वच्छ ठेवावीत असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिका प्रशासनाला दिला होता. याकरिता ३१ मार्च पर्यंत मुदत आखुन दिली होती. मात्र याबाबतची अंतिम योजना अद्याप पूर्ण न झाल्याचीही माहिती मिळाल्याने तसेच चार पालिकांकडून न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जात असल्याने नमूद करून न्यायालयाने सर्व पालिकांना १५ जुन पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. तसेच ही अंतिम संधी असल्याचे न्यायालयाने खडसावले. वर्धा पालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा भाजपा नगरसेवकांकडून निषेध करण्यात येत असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले. नगरपालिकेत भाजपाचे शासन असताना शहराच्या विकासासाठी घेण्यात आलेल्या निर्णयाकडे व न.प. चे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीकोणातून आखलेल्या योजनांकडे सत्ताधारी प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी निवेदनातून करण्यात आला. या विविध मागण्याचे निवेदन प्रभारी जिल्हाधिकारी संजय भागवत यांना देण्यात आले.यावेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्यासोबत केलेल्या चर्चेत काही सूचना सांगितल्या. दूर्गा टॉकीजच्या परिसरात नाल्यावर स्लॅब टाकून स्वच्छतागृहाची निर्मिती करण्यात यावी, यासह आर्वी नाका चौकात स्वच्छतागृह बांधावे. यावेळी माजी नगराध्यक्ष अतुल तराळे, गटनेते कमल कुलधारिया, प्रदीप ठाकरे, मंगेश मांगलेकर, सतीश मिसाळ, वीरू पांडे यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)