अंदोरी टी पॉंईट अपघातप्रवण स्थळाची खासदारांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 06:00 AM2020-01-23T06:00:00+5:302020-01-23T06:00:09+5:30

नेहमी होणाऱ्या घटनांमागचे तांत्रिक कारण शोधण्यासोबतच उपाय काढण्यासाठी खासदार रामदास तडस यांनी रस्ते महामार्गाचे प्रकल्प संचालन प्रशांत मेंढे व बिल्डकॉनचे जनरल मॅनेजर आर.ए.त्यागी यांना सोबत आणून कामाचे निर्देश दिले. स्थानिक यशोदा नदी ओलांडून अंदोरीकडे वळणाऱ्या मार्गावर परिसरातील २२ गावे असून या सर्वांचे तालुक्याचे ठिकाण व मुख्य बाजारपेठ म्हणून देवळीसोबत नाळ जुळली आहे.

Andori Tea Point crash accident site inspection by MPs | अंदोरी टी पॉंईट अपघातप्रवण स्थळाची खासदारांकडून पाहणी

अंदोरी टी पॉंईट अपघातप्रवण स्थळाची खासदारांकडून पाहणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : आतापर्यंत ८ ते १० अपघाताला कारणीभूत ठरलेल्या तसेच रस्ता बांधकामातील तांत्रिक कारणाअभावी अडचणीच्या ठरलेल्या अंदोरी टी पॉर्इंटची खासदार रामदास तडस,राष्ट्रीय महामार्ग व बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी उपस्थित नागरिकांनी वारंवार होणाºया या घटनांना संबंधीत अधिकारी व त्यांची कार्यपद्धती कारणीभूत असल्याचा ठपका ठेवला. काल परवा पुन्हा या पॉर्इंटवर ट्रॅव्हल्स अपघातात भाऊराव फटींग नामक शेतमजुराचे दोन्ही पाय निकामी झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
नेहमी होणाऱ्या घटनांमागचे तांत्रिक कारण शोधण्यासोबतच उपाय काढण्यासाठी खासदार रामदास तडस यांनी रस्ते महामार्गाचे प्रकल्प संचालन प्रशांत मेंढे व बिल्डकॉनचे जनरल मॅनेजर आर.ए.त्यागी यांना सोबत आणून कामाचे निर्देश दिले. स्थानिक यशोदा नदी ओलांडून अंदोरीकडे वळणाऱ्या मार्गावर परिसरातील २२ गावे असून या सर्वांचे तालुक्याचे ठिकाण व मुख्य बाजारपेठ म्हणून देवळीसोबत नाळ जुळली आहे. हा ग्रामीण रस्ता वर्दळीचा ठरला असताना प्रशासनाच्यावतीने देवळीकडे जाणाºया वळण रस्त्यावर बोगदा न देता या मार्गाची वाहतूक सरळ महामार्गावर काढण्यात आली. त्यामुळे रस्ता नियमाचे विरोधात व चुकीच्या पद्धतीने ही वाहतूक महामार्गावर येत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले.
दोन महिन्यांपूर्वी या ठिकाणी सीआरपीएफ जवानाचा अपघाती मृत्यू झाला. यानंतर काल परवा झालेल्या अपघातात देवळीतील शेतमजूरांचे दोन्ही पाय निकामी होवून मृत्यूशी झुंज देत असल्याने रोष व्यक्त करण्यात आला. यावेळी खासदार व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या तोडग्यानुसार तात्पुरती व्यवस्था म्हणून अंदोरी टी पॉर्इंटवरून यवतमाळकडे जाणाºया महामार्गावर युटर्न देण्याचे तसेच याठिकाणी वाहतुकीचे नियमानुसार सोलर लाईट रिफ्लेक्टर, थर्माप्लॉस्टीकचे ब्रेकर बसविण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. तसेच नेहमीसाठीची व्यवस्था म्हणून अंदोरी वळण रस्त्यावर उजव्या बाजूने महामार्गाला समांतर रस्ता काढून हा रस्ता स्मशानभूमीच्या रस्त्याला जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी प्रशासकीय सोपस्कार व अपेक्षीत इस्टीमेट तयार करून रस्ता बांधकाम पूर्णत्वास नेणार असल्याने खासदार रामदास तडस यांनी यावेळी सांगितले. नागरिकांनी याबाबतचे निवेदन खासदारांना व अधिकाºयांना देवून लक्ष वेधले. यवतमाळ - वर्धा या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या या महामार्गामुळे लहान गावांना जाण्यासाठी कमालीची अडचण येत आहे. मागणीचा पाठपुरावा प्रणय जोशी, दशरथ भुजाडे, रवि कारोटकर, संजय मुजबैले, राजू झिलपे, अनिल खोंड, विनोद तेलरांधे, अंकीत टेकाडे, नरेश कारोटकर, वसंत तेलरांधे, मनोज कामडी, विजय ढाकुलरकर, वसंत घोडे, संजय सोनवने, सुनिल आजनकर व नागरिकांनी केले.

Web Title: Andori Tea Point crash accident site inspection by MPs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.