शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांना भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 05:00 IST

पॅसेंजर रेल्वेगाड्यांमधून जास्तीत जास्त गरीब प्रवासी प्रवास करताना दिसतात. प्रवासभाडे कमी असल्याने सवारी गाड्यांमधून प्रवास करताना दिसतात. मात्र, सध्या पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद असल्याने गरीब प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत असून चांगलाच आर्थिक फटका बसत आहे. पॅसेंजर गाड्या अभावी गरीब प्रवाशांची होरपळ होत असल्याचे चित्र बघावयास मिळत असून वेळीच पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू झाल्यास सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळेल.

ठळक मुद्देकेवळ विशेष रेल्वेगाड्याच सुरू

  लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या जिल्ह्यातील सर्व रेल्वेस्थानकाहून केवळ कोविड विशेष रेल्वेगाड्या धावतात. त्यातही आरक्षण असल्याशिवाय रेल्वेगाडीत बसता येत नसल्याने अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांची चांगलीच होरपळ होत असून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे. वर्धा रेल्वेस्थानक हे जंक्श्न असल्याने या स्थानकावरुन मोठ्याप्रमाणात रेल्वेगाड्या धावतात. सध्या वर्धा रेल्वेस्थानकावरुन अप आणि डाऊन मार्गावर ३६ कोविड स्पेशल ट्रेन धावत आहेत. मात्र, वर्धा येथून पुलगाव, धामणगाव, हिंगणघाट, सेलू रोड, बडनेरा आदी ठिकाणी जाण्यासाठी प्रवासी गाड्या बंद केल्याने बाहेरगावी शिक्षण घेणारे, नोकरीवर असणारे तसेच विविध शासकीय कार्यालयासह बॅंकेत काम करणाऱ्यांसह गोरगरीबांची होरपळ होत असून जादा प्रवासभाडे देवून त्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे. यात सर्वसामान्य प्रवाशांचे कंबरडे मोडत असल्याने  पॅसेंजर सुरु करण्याची मागणी आहे.

पुणे, मुंबई रेल्वेगाड्या सुरू सध्या ३६ स्पेशल गाड्या वर्धा रेल्वेस्थानकावरून धावतात. त्यामध्ये विर्दर्भ एक्सप्रेस, मेल एक्सप्रेस, नागपूर ते पुणे एक्सप्रेस आदी रेल्वेगाड्या धावतात. मात्र, या गाड्यांमध्ये आरक्षण असल्याशिवाय बसता येत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे.

नागपूर-भूसावळ-नागपूर पॅसेंजर गाडी बंदचनागपूर ते भूसावळ तसेच भूसावळ ते नागपूर, नागपूर ते बल्लारशाह आदी  ६ प्रवासी रेल्वेगाड्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजूनही बंद आहे. त्या सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

रेल्वेत आरक्षणाविना प्रवासास बंदी आहे. एका सीटवर तीन प्रवासी असे धोरण असल्याने अप-डाऊन शक्य नाही. खासगी वाहनाने जास्त खर्च लागत असून पॅसेंजर गाड्या सुरु करण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. - डॉ. नीलेश वाघ, अध्यक्ष प्रवासी संघटना.  

गरीब प्रवाशांसमोर आर्थिक संकटपॅसेंजर रेल्वेगाड्यांमधून जास्तीत जास्त गरीब प्रवासी प्रवास करताना दिसतात. प्रवासभाडे कमी असल्याने सवारी गाड्यांमधून प्रवास करताना दिसतात. मात्र, सध्या पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद असल्याने गरीब प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत असून चांगलाच आर्थिक फटका बसत आहे. पॅसेंजर गाड्या अभावी गरीब प्रवाशांची होरपळ होत असल्याचे चित्र बघावयास मिळत असून वेळीच पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू झाल्यास सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळेल. 

टॅग्स :railwayरेल्वेCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या