शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

पुराणातील मिथके म्हणजे विज्ञान नव्हे

By admin | Updated: February 7, 2015 01:27 IST

पुराणतगं्रथातील मिथके ही संशोधकवृत्तीने तपासून पाहिल्यास त्यातील फोलपणा लक्षात येतो. म्हणूनच मिथक हा साहित्य संस्कृतीचा एक भाग असू शकतो, ...

वर्धा : पुराणतगं्रथातील मिथके ही संशोधकवृत्तीने तपासून पाहिल्यास त्यातील फोलपणा लक्षात येतो. म्हणूनच मिथक हा साहित्य संस्कृतीचा एक भाग असू शकतो, पण या कल्पना म्हणजे विज्ञान नव्हे, असे प्रतिपादन परभणी येथील लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. साहेब खंदारे यांनी केले. स्थानिक शिववैभव सभागृहात बुधवारी यशवंतराव दाते स्मृती व्याख्यानमालेच्या प्रथम सत्रात ते बोलत होते. डॉ. खंदारे यांनी साहित्य आणि समाज यातील समकालीन संदर्भ या विषयावर संवाद साधला. यावेळी मंचावर संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते, ज्येष्ठ समाजसेवी डॉ. सतीश गोगुलवार, समीक्षक वंदना भागवत, कादंबरीकार मनोहर पाटील, कवी श्रीकांत देशमुख, कथाकार साधना कामत, मालविका देखणे, प्रा. शेख हाशम, संजय इंगळे तिगावकर, प्रा. राजेंद्र मुंढे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.डॉ. खंदारे म्हणाले धर्मसत्ता, राजसत्ता, समाजसत्ता आणि शिक्षणासारख्या उपयोजक सत्ता याची महत्वपूर्ण भूमिका आपल्या जीवनात असते. धर्मसत्ता मानवी जीवन सुसह्य करण्यासाठी असते. मात्र जी धार्मिक सहिष्णुता प्राचीन आणि संत साहित्यात होती ती आजच्या साहित्यात दिसत नाही. धर्माच्या नावावर माणसे रक्तबंबाळ होत आहेत. राजसत्ता आणि समाजसत्ता मानवाला निराश करीत आहे, तर शिक्षणसत्ता स्वत:च दिशाहीन झाली आहे. अशावेळी नव्याने संस्कृतीची जमीन कसण्याची आणि विचारांचे बियाणे रूजविण्याची जबाबदारी साहित्याला स्वीकारावी लागेल. वर्तमानकालीन समस्याचे उत्तर साहित्यातून आले पाहिजे. या विचारांची दखल शासनाने आणि समाजाने घेतली पाहिजे. या साहित्यातील विचारांची चळवळ निर्माण झाली पाहिजे. तरच, साहित्याची नाळ समाजाशी जोडली जाईल, असे मत डॉ. खंदारे यांनी मांडले.प्रास्ताविक प्रा. शेख हाशम यांनी केले. संचालन डॉ. स्मिता वानखेडे यांनी केले. आभार प्रदीप दाते यांनी मानले. व्याख्यानमाला माजी आमदार सुरेश देशमुख, जयंत साळवे, किशोर माथनकर, राम जाधव, डॉ. सतीश पावडे, सुनिता इथापे, विजय मुळे, आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. आयोजनासाठी हेमंत दाते, प्रा. बाबाराव बेले, प्रकाश येंडे, शेषराव बिजवार, रंजना दाते, प्रशांत पनवलकर, डॉ. पुनसे, प्रा. गावंडे आदींनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)