शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस लांबल्याने पेरण्या खोळंबल्या

By admin | Updated: July 7, 2014 00:04 IST

गाढव वाहन असलेले पुनर्वसू नक्षत्र ६ जुलैपासून सुरू झाले, तरीसुद्धा खरीप हंगामाला सुरुवात झाली नाही. यामुळे बळीराजा विवंचनेत आहे. सोयाबीनच्या पेरण्या अद्याप न झाल्याने शेतकऱ्यांना खरीप

घोराड : गाढव वाहन असलेले पुनर्वसू नक्षत्र ६ जुलैपासून सुरू झाले, तरीसुद्धा खरीप हंगामाला सुरुवात झाली नाही. यामुळे बळीराजा विवंचनेत आहे. सोयाबीनच्या पेरण्या अद्याप न झाल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांची काळजी आहे. रोहिणी किंवा मृग नक्षत्रात कपाशी, तूर, ज्वारी, सोयाबीन या पिकाची शेतात रोवणी करण्यात येते. मात्र रोहिणी, मृग, अन त्या पाठोपाठ आलेल्या आर्द्रा नक्षत्रातही पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे पिकांच्या पेरणीला जवळपास एक ते दीड महिना विलंब झाला आहे. अजूनही उन्हाळा तापत आहे. शेतातील जमीन गरम होत आहे. यामुळे बियाण्यातील अंकुराला याच्या झळा बसतात. परिणामी बीज उगविण्याच्या पूर्वीच उन्हामुळे करपण्याची स्थिती आहे. आकाशात तयार होणारे ढगाळ वातावरण कधी कधी आशेचा किरण देत असले तरी शेतकऱ्यांची निराशा होत आहे. गत काही दिवसाअगोदर आलेल्या पावसाने आस लावली अन मोजक्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीला सुरुवात केली. पण दुपारीच पडलेल्या कडक उन्हामुळे पेरणी बंद केली. सेलू तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र अधिक आहे. अजूनही काळया मातीत तिफण चाललीच नाही. या नक्षत्रात हिरवा शालू परिधान करणारी शेत माऊली पावसाची प्रतीक्षा करीत आहे. महागडे सोयाबीनचे बियाणे शेतकऱ्यांच्या नजरेपुढे घरी पडून आहे. खर्चात उतरलेला शेतकरी कपाशीची झालेली मोड उगवलेले अंकूर मरणासन्न होतांना पाहून डोळयात अश्रु दाटून येत आहे. पावसाळ्यासाठी उन्हाळाच तापत असेल तर कालचक्र तर बदलले नसावे, असा अंदाज व्यक्त होत आहे. स्प्रिंकलरवर पेरा करावा तर विहिरीच्या पाण्याची पातळी खालावत आहे. त्यामुळे खरीप हंगाम चांगला राहील ही भाबडी आशा आता फोल ठरली आहे.(वार्ताहर)