उर्ध्व वर्धा धरणाचे ३१ दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 06:00 AM2019-09-18T06:00:00+5:302019-09-18T06:00:07+5:30

निम्न वर्धा प्रकल्पाच्या जलसाठ्यात कमालीची वाढ झाल्याने या धरणातील बुडीत क्षेत्रात येणाऱ्या धारवाडा व दुर्गवाडा या गावांना पाण्याचा वेढा आहे. गावातील अंतर्गत रस्त्यावर धरणाचे पाणी आल्याचे दिसून येते. धारवाडा येथील दोन घरात धरणाचे पाणी घुसल्याने त्या कुटुंबांना पूनर्वसीत गावातील समाज मंदिरात हलविण्यात आले आहे.

8 doors of Upper Wardha Dam opened | उर्ध्व वर्धा धरणाचे ३१ दरवाजे उघडले

उर्ध्व वर्धा धरणाचे ३१ दरवाजे उघडले

Next
ठळक मुद्देनदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा : दोन गावांना पाण्याचा वेढा

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : उर्ध्व वर्धा धरण प्रकल्पाचे पाणी वर्धा नदी पात्रात सोडण्यात आल्याने तालुक्यातील धनोडी बदहाद्दरपूर धरण पूर्णपणे भरले आहे. जलसाठ्यात वाढ होत असल्याने या धरणाच्या बुडीत क्षेत्रातील धारवाडा व दुर्गवाडा या गावाला पाण्याचा वेढा असून नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उर्ध्व वर्धा धरणाचे ३१ दरवाजे उघण्यात आले असून नागरिकांनीही दक्ष राहण्याचे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे.
निम्न वर्धा प्रकल्पाच्या जलसाठ्यात कमालीची वाढ झाल्याने या धरणातील बुडीत क्षेत्रात येणाऱ्या धारवाडा व दुर्गवाडा या गावांना पाण्याचा वेढा आहे. गावातील अंतर्गत रस्त्यावर धरणाचे पाणी आल्याचे दिसून येते. धारवाडा येथील दोन घरात धरणाचे पाणी घुसल्याने त्या कुटुंबांना पूनर्वसीत गावातील समाज मंदिरात हलविण्यात आले आहे. दरम्यात गावात पाणी शिरत असल्याने धारवाडा व दुर्गवाडा या गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उर्ध्व वर्धा धरणाची पाणी साठवण क्षमता २८३.८० दलघमी आहे. दरम्यान सोमवारी हे धरण पूर्णपणे भरले आहे. भादोड, पिपरी व बहाद्दरपूर या गावातील काही शेतात धरणाचे पाणी जमा झाले असून शेतातील पीक पाण्यात बुडले आहे. धारोडा या गावातील तीन घरातील रामकृष्ण इंदोरे, चंद्रशेखर इंदोरे, ओंकार मेहंगे, यांना सुरक्षीत ठिकाणी हलविण्यात आले आहे. प्रकल्पात पाणी साठ्यामध्ये क्षणाक्षणाला वाढ होत आहे, असे सहा. अभियंता पवन पांढरे यांनी सांगितले.

बॅक वॉटरमुळे शेतकऱ्यांचे २५ लाखांचे नुकसान
नजीकच्या वाठोडा शिवारातील शेतकरी अतुल ठाकरे यांच्या शेताला सध्या तळ्याचे स्वरूप आले आहे. लोअर वर्धा प्रकल्पाचे बॅक वॉटर त्यांच्या शेतात शिरल्याने उभ्या पिकांना जलसमाधी मिळाली आहे. विशेष म्हजे हे शेत अधिग्रहित करण्यात आलेले नाही. ंसंपूर्ण १३ एकरातील सोयाबीन, हळद, तूर व कपाशीचे पीक सध्या पाण्यात असून संत्रा, मोसंबी आणि लिंबाच्या बगीच्यालाही तळ्याचे स्वरूप आले आहे. बॅक वॉटरमुळे ओढावलेल्या या परिस्थितीमुळे शेतकऱ्याचे सुमारे २५ लाखांचे नुकसान झाले आहे. उल्लेखनीय म्हणजे कायमस्वरूपी उपाय योजना करण्यासाठी यापूर्वी शेतकºयांने संबंधितांना निवेदन दिली आहे. परंतु, त्या निवेदनांना केराची टोपलीच दाखविण्यात धन्यता मानली जात आहे. शासकीय मदत देण्याची मागणी आहे.

देवळी तालुक्यातील २९ गावे ‘हायअलर्ट’वर
पुलगाव : सततच्या पावसामुळे निम्न वर्धा धरण ९८ टक्के भरले असून सोमवारी रात्री पाणी धरणातील पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून वर्धा नदीच्या काठावर असलेल्या देवळी तालुक्यातील २९ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणपातळी २८३.६३० मि.मी. असून धरण ९८ टक्के भरले आहे. निम्न वर्धा प्रकल्पातून ९० घनमीटर प्रतिसेकंद याप्रमाणे पाण्याचा विसर्ग वर्धा नदी पात्रात होत आहे. शिवाय ३१ दरवाजे उघडण्यात आले आहे. यामुळे संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेता वर्धा नदीच्या काठच्या शिरपूर, खाडा, अंदोरी, कांदेगाव रोहिणी, तांबा, हिवरा, सावंगी (ये.) बाबुळगाव, निमगव्हाण, बोपापुर, आंजी (लहान), दहेगाव (धांदे), आपटी, नांदगाव, कवडगाव, वाघोली, पुलगाव या १९ गावाव्यतीरिक्त वर्धा नदीशी संलग्न असणाºया यशोदा नदी काठावरील दिगडोह, दिघी, बोपापूर, आलोडा, सरुळ, बोरगाव, टाकळी (ब), जामणी, कोल्हापूर,(सि.) या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: 8 doors of Upper Wardha Dam opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण