शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण करातून ६.७५ कोटी वसूल

By admin | Updated: June 11, 2014 00:11 IST

शहरातून शिक्षणकराच्या नावावर गत आठ वर्षांत सहा कोटी ७५ लाख २१ हजार ६२२ रुपये वसूल करण्यात आले. हा कर वर्धा वासियांकडून नगर पालिकेच्यावतीने वसूल करण्यात येत असला तरी पालिकेच्या शिक्षण

माहितीचा अधिकार : पालिकेच्या शाळांचे खस्ता हाल, नावाचे फलक बेपत्ता, बसण्याकरिता बाकही नाही रूपेश खैरीे - वर्धा शहरातून शिक्षणकराच्या नावावर गत आठ वर्षांत सहा कोटी ७५ लाख २१ हजार ६२२ रुपये वसूल करण्यात आले. हा कर वर्धा वासियांकडून नगर पालिकेच्यावतीने वसूल करण्यात येत असला तरी पालिकेच्या शिक्षण विभागाला याचा कुठलाही लाभ होत नसल्याचे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले. मग शहरातून हा कर कशाकरिता, असा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.नगर परिषदेच्यावतीने कर आकारताना प्रत्येक रहिवाशाकडून शिक्षणकर वसूल करण्यात येतो. या कराचा वापर शहराच्या शैक्षणिक विकासाकरिता करण्यात येत असल्याची धारणा कर देणाऱ्याच्या मनात येत आहे; मात्र वास्तव काही औरच आहे. या कराचा पालिकेला कुठलाही लाभ नाही. त्यांना यातील एक टक्काही वापरण्याची मुभा नाही. शासनाला शिक्षण कराच्या नावावर एवढा कर देणाऱ्या येथील पालिकेच्या शाळांची मात्र दैना झाली आहे. शहरात पालिकेच्या एकूण ११ शाळा आहेत. यात दहा प्राथमिक व एका हायस्कूलचा समावेश आहे. या शाळातून पालिकेच्यावतीने ज्ञानदानाचे कार्य होते. ज्ञानदान होत असल्याने या इमारती विविध सुविधांना सुसज्ज असणे अनिवार्य आहे. तसे शासनाचे नियमही आहेत. असे असताना येथे कुठल्याही सुविधा नाहीत. शिक्षणाच्या नावावर मोठा कर शासनालास देणाऱ्या पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्याकरिता साधे बाक नाहीत. त्यांना शाळेत चटईवर बसावे लागते. त्याही फाटक्याच. पिण्याकरिता शुद्ध पाणी नाही, तर स्वतंत्र शौचालयाची सुविधा शहरातील पालिकेच्या एकाही शाळेत नसल्याचे दिसून आले आहे.शासनाच्या नियमानूसार सर्वच शाळेत मुलांकरिता व मुलींकरिता स्वतंत्र शौचालय देण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र वर्धा शहरातील पालिकेच्या कुठल्याही शाळेत अशी सुविधा नाही. शहरातून वसूल होत असलेल्या कराच्या रक्कमेतून काहीच मिळत नसले तरी शासनाकडून येत असलेले ८० टक्के अनुदान व पालिकेचा २० टक्क्यांचा वाटा यातून पालिकेच्या शिक्षण विभागाचे कार्य सुरू असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. सुरू महिन्याच्या २६ तारखेपासून नवे शैक्षधिक सत्र सुरू आहे. असे असताना पालिकेच्या एकाही शाळेची रंगरंगोटी वा कुठलीही दुरूस्ती करण्यात आली नाही. शहरातील प्रत्येक शाळेला मोठ्या विभुतींची नावे देण्यात आली आहेत. त्यांची नावेही या शाळांवर दिसत नाही. काही ठिकाणी तर पालिकेची शाळा आहे हे कुणाला शोधूनही सापडणे कठीण आहे.