शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिक शिबिरात ६० शेतकऱ्यांचा सहभाग

By admin | Updated: February 8, 2015 23:37 IST

डॉ़ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा येथील प्रक्षेत्रावर सोमवारपासून कृषी तंत्रज्ञान सप्ताहास प्रारंभ झाला़ कृषी विज्ञान केंद्र व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन

वर्धा : डॉ़ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा येथील प्रक्षेत्रावर सोमवारपासून कृषी तंत्रज्ञान सप्ताहास प्रारंभ झाला़ कृषी विज्ञान केंद्र व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने सोयाबीन प्रक्रिया तंत्रज्ञान विषयावर तीन दिवसीय व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यात आले़ यात जिल्ह्यातील ६० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला़ सेलू, वर्धा, देवळी या तालुक्यातील विविध गावांतून शेतकरी हजर झाले़ तीन दिवसीय शेतकरी व्यावसायिक प्रशिक्षणाचे उद्घाटन महात्मा गांधी ग्रामीण औद्यौगिकरण संस्थेचे संचालक डॉ़ प्रफुल्ल काळे यांच्या हस्ते पार पडले़ अध्यक्षस्थानी डॉ़ सुरेश नेमाडे तर अतिथी म्हणून चंद्रकांत मोहरकर, पूजा मोहरकर, माजी प्राचार्य रेखा ठाकरे आदी उपस्थित होते़ प्रशिक्षण संयोजक म्हणून विषय विशेषज्ञ उज्वला सिरसाट होत्या़ प्रशिक्षणात पूजा मोहरकर यांनी सोयाबीन प्रक्रिया उद्योगासाठी कानमंत्र विषयावर मार्गदर्शन केले़ प्रशिक्षणार्थीना एमआयडीसी स्थित सोयाबीन प्रक्रिया युनिटवर भेट देत पाहणी करता आली़ प्रा़ ठाकरे यांनी सोयाबीनचे महत्त्व, त्यातील पोषक घटक व अन्नमूल्य तसेच सोयाबीनपासून प्रक्रिया पदार्थावर सोयाबीन, दाळ, सोयादुध, आटा, पनीर, नटस, कॉफी शिरा आदी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले़ डॉ़ सुरेश नेमाडे यांनी प्रशिक्षण घेतल्यानंतर मुल्यवर्धीत प्रक्रिया उद्योग उभारणी तसेच उच्चत्तम प्रथिनेयुक्त सोयाअन्न निर्मिती व प्रत्येक ग्रामीण तसेच शहरी कुटुंबांत सोयायुक्त आहाराचा समावेश होईल, ही अपेक्षा व्यक्त केली़ प्रशिक्षणार्थींना कृषी तंत्रज्ञान सप्ताहानिमित्त ११ फेबु्रवारीपर्यंत आयोजित भरडधान्य ज्वारी प्रक्रिया तंत्रज्ञान विषयावरील व्यावसायिक प्रशिक्षणाची माहिती देण्यात आली़ समारोपाला अशोक अडेकार, नितीन ठाकरे, रमेश ढोकणे उपस्थित होते़ संचालन प्रा़ सिरसाट यांनी केले तर आभार डॉ़ दवने यांनी मानले़(कार्यालय प्रतिनिधी)