शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

४५८ कृषी केंद्रांची झाली तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 05:00 IST

जिल्ह्यात यंदा २ लाख १८ हजार हेक्टरवर कपाशी, १ लाख ३९ हेक्टवर सोयाबीन, ६५ हजार हेक्टरवर तूर, १ हजार ६२५ हेक्टरवर ज्वारी, २ हजार २०० हेक्टरवर भुईमुंग, ८०० हेक्टरवर मुंग, ९०० हेक्टरवर उडिद तर १ हजार १०० हेक्टरवर मका पिकाची लागवड होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे. शिवाय त्यासाठी बियाणे आणि खताचा मुबलक प्रमाणात साठा बाजारपेठेत उपलब्ध झाला आहे.

ठळक मुद्देबोगस बियाण्यांना ब्रेक लावण्यासाठी प्रशासन सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खरीप हंगामासाठी शेतकरी सज्ज झाला आहे. शिवाय विविध बियाणे खरेदीसाठी शेतकरी कृषी केंद्रांमध्ये गर्दी करीत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमा सील केल्या असल्या तरी कुठल्याही परिस्थितीत बाजारपेठेत बोगस बियाण्यांचा शिरकाव होऊन शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागाने कंबर कसली असून २ जून पर्यंत जिल्ह्यातील ४५८ कृषी केंद्राची कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली आहे.जिल्ह्यात यंदा २ लाख १८ हजार हेक्टरवर कपाशी, १ लाख ३९ हेक्टवर सोयाबीन, ६५ हजार हेक्टरवर तूर, १ हजार ६२५ हेक्टरवर ज्वारी, २ हजार २०० हेक्टरवर भुईमुंग, ८०० हेक्टरवर मुंग, ९०० हेक्टरवर उडिद तर १ हजार १०० हेक्टरवर मका पिकाची लागवड होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे. शिवाय त्यासाठी बियाणे आणि खताचा मुबलक प्रमाणात साठा बाजारपेठेत उपलब्ध झाला आहे. सध्या बियाणे खरेदीसाठी बाजारपेठेत शेतकरी गर्दी करीत आहे. याच बियाणे खरेदीदरम्यान बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारून त्यांची फसवणूक होण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाकडून एकूण नऊ भरारी पथक तयार करण्यात आले आहे. याच पथकासह कृषी विभागाच्या अधिकाºयांनी आतापर्यंत ४५८ कृषी केंद्रांवर छापा टाकून दुकानांची तपासणी केली आहे. शिवाय ही तपासणी मोहीम आणखी काही दिवस सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.गिरड अन् हिंगणघाटात आढळले बोगस बियाणेगोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकून गिरड येथील एका दुकानातून कपाशीचे ३ किलो बियाणे आणि हिंगणघाट येथील एका दुकानातून कपाशीचे दहा पाकिट बियाणे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. हे बियाणे बोगस आहे काय याची शहानिशा करण्यासाठी त्याचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत २७ मे रोजी पाठविण्यात आले आहे. पण अद्यापही प्रयोगशाळेचा अहवाल कृषी विभागाला प्राप्त झालेला नाही.जिल्ह्यात एकूण १ हजार २१५ कृषी केंद्रवर्धा जिल्ह्यात एकूण १ हजार २१५ कृषी केंद्र आहेत. त्यापैकी ४५८ कृषी केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे. तर उर्वरित कृषी केंद्राची तपासणी येत्या दोन ते तीन दिवसांत करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.या अधिकाऱ्यांना करावी लागेल तक्रारकपाशीच्या बियाण्यांबाबत काही तक्रारी असल्यास शेतकºयांना उपविभागीय कृषी अधिकाºयांकडे त्याची तक्रार करता येणार आहे. तर तूर, सोयाबीन व इतर पिकांच्या बियाण्यांबाबत तक्रार असल्यास शेतकऱ्यांना ती तालुका कृषी अधिकारी किंवा पं.स. कृषी विभागाकडे करता येणार आहे.गिरड व हिंगणघाट येथून जप्त करण्यात आलेल्या बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले आहे. लवकरच आम्हाला अहवाल प्राप्त होईल अशी अशा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कृषी केंद्र चालकाने जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून बियाणे, खत व औषधींची विक्री करावी. शिवाय बियाण्यांबाबत काही अडचणी असल्यास कृषी विभागाकडे शेतकºयांनी तक्रारी कराव्या. वेळीच तक्रारीची दखल घेतली जाईल.- अनील इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वर्धा.

टॅग्स :FarmerशेतकरीMarketबाजार