शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

निर्णयाचे २४ तास

By admin | Updated: May 15, 2014 01:46 IST

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता अवघे २४ तास शिल्लक आहेत. कोण असेल नवीन खासदार! काँग्रेस आघाडीचे सागर मेघे की महायुतीचे रामदास तडस..?

उत्सुकता शिगेला : नवे खासदार सागर मेघे की रामदास तडस ?वर्धा : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता अवघे २४ तास शिल्लक आहेत. कोण असेल नवीन खासदार! काँग्रेस आघाडीचे सागर मेघे की महायुतीचे रामदास तडस..? अशी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.१0 एप्रिलला मतदान झाल्यानंतर निकाल तब्बल महिनाभराने लागणार असल्याने उत्सुकता चांगलीच ताणली गेली. आता अवघ्या २४ तासांनी मतमोजणीला सुरुवात होणार असून नागरिक आतुरतेने वाट बघत आहेत. १५ लाख ६२ हजार ७१२ पैकी १0 लाख १२ हजार १९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २00९ च्या लोकसभा निवडणुकीत ७ लाख ६८ हजार ४१४ मतदारांनी मतदान केले होते. यावेळी तुलनेत तब्बल २ लाख ४३ हजार ७७८ मते अधिक झाली. ही मते कुणाच्या पथ्यावर पडतील, यावर निकालाचे गणित अवलंबून आहे. २00९ मध्ये विद्यमान खासदार दत्ता मेघे यांनी ३ लाख ५२ हजारांवर मते घेत ९५ हजारांवर मताधिक्याने विजयश्री खेचून आणला होती. या निवडणुकीत काँग्रेसचे सागर मेघे यांच्या पारड्यात ही मते पडतील? बसपा उमेदवार चेतन पेंदाम २00९ मधील बसपाची मते आपल्या पारड्यात पाडून घेण्यात यशस्वी होईल? आम आदमी पार्टीचे अलिम पटेल किती मते घेतील, बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार किशोर किनकर कुणाची मते खातील? मोदी फॅक्टरमुळे रामदास तडस चमत्कार घडवतील? हे प्रश्न नागरिक, राजकीय समीक्षकांच्या डोक्यात रुंझी घालत आहे.लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच वर्धा लोकसभा मतदार संघातील चित्र मतदारांच्या डोळ्यापुढे होते. काँग्रेस उमेदवार सागर मेघे यांचे पारडे इतर उमेदवारांपेक्षा जड वाटत होते; पण जसजशी मतदानाची तारीख जवळ येत होती, तसतशी मोदी लहर वाढत होती. अखेरच्या दोन दिवसांत सर्वत्र मोदी लहर असल्याचे बोलले जात होते. मतदानानंतर सागर मेघे व रामदास तडस यांच्यात काट्याची टक्कर होईल, अशी भाकिते वर्तविणे सुरु झाले. यातही जो कुणी विजयी होईल, त्यांच्या मतांमध्ये १0 ते १५ हजार मतांचाच फरक असेल, या अनुषंगानेही आकडेमोड केली जात आहे. यामुळे वर्धा लोकसभा क्षेत्राचा नवीन खासदार सागर मेघे वा रामदास तडस, हे सांगणे अवघड होऊन बसले. निवडणूक निकालांतीच हे रहस्य उलगडणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)