शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २१ लाख क्विंटल कापसाची आवक

By admin | Updated: February 8, 2015 23:36 IST

कधी सुरू कधी बंद अशा स्थितीत कापसाची शासकीय खरेदी सुरू आहे. शासकीय खरेदी बंद असल्याचा लाभ उचलत व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी केली. शासकीय व व्यापाऱ्यांची खरेदी

वर्धा : कधी सुरू कधी बंद अशा स्थितीत कापसाची शासकीय खरेदी सुरू आहे. शासकीय खरेदी बंद असल्याचा लाभ उचलत व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी केली. शासकीय व व्यापाऱ्यांची खरेदी मिळून शनिवारपर्यंत जिल्ह्यात एकूण २० लाख ७६ हजार ९३९ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना एवढा कापूस आला कुठून अशी चर्चा सुरू आहे. जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाने मारलेल्या दडीमुळे कापसाचे उत्पन्न कमी होईल, असे बोलले जात असताना कापसाची विक्रमी आवक झाली. कापसाची खरेदी उशिरा सुरू झाल्याने यंदा शेतकऱ्यांची अडचण झाली. शासनाची खरेदी सुरू झाली नसल्याने शेतकऱ्यांनी प्रारंभीपासूनच त्यांचा कापूस व्यापाऱ्यांना विकण्याचा सपाटा सुरू केला. यामुळेच की काय शासकीय खरेदीपेक्षा व्यापाऱ्यांची खरेदी अधिक आहे. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मिळणारा दर कमी असला तरी त्यांनाच कापूस देण्याचे कारण न उलगडणारे आहे. हमीभाव मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी सीसीआयला त्यांचा कापूस देण्याचा निर्णय घेतला. सीसीआयच्यावतीने ६ लाख ८३ हजार ७४८ क्विंटल कापसाची खरेदी झाली. दरम्यान सीसीआयच्यावतीने जागेचे कारण काढून खरेदी बंद केली. याचा लाभ व्यापाऱ्यांना झाला. व्यापाऱ्यांनी कापसाचे दर पाडत ३ हजार ६०० रुपयांत कापसाची खरेदी केली. असे असतानाही व्यापाऱ्यांची खरेदी शासकीय खरेदीच्या दुप्पट आहे. व्यापाऱ्यांनी एकूण १३ लाख ९३ हजार १९१ क्विंटल कापसाची खरेदी केली. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)