शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

१७३ पाणवठे भागविताहेत वन्यप्राण्यांची तृष्णा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 05:00 IST

दरवर्षी जलसंकट निर्माण होत असले तरी यावेळी जिल्ह्यातील जलसाठ्याची परिस्थिती चांगली आहे. मात्र, उन्हाचा पारा चढत जातो, तसे जंगल परिसरातील नदी-नाले कोरडे होतात. वनविभागाकडून साधारणत: मार्चच्या सुमारास कृत्रिम आणि नैसर्गिक पाणवठ्यांची निर्मिती केली जाते. आठ वनपरिक्षेत्रांत वन्यप्राण्यांकरिता हातपंप, टाके, बशी टाके, नैसर्गिक झरा, तलाव, सौरपंप आदी प्रकारचे पाणवठे असून वन्यप्राण्यांची तहान भागविण्यास उपयोगी ठरत आहेत.

ठळक मुद्देआठ वनपरिक्षेत्रातील स्थिती : प्रत्येक क्षेत्रात २० ते २२ ट्रॅप कॅमेऱ्यांचा ‘वॉच’

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गतवर्षी अत्यल्प पर्जन्यमानामुळे जलसंकट गडद झाले होते. यंदा समाधानकारक पाऊस झाला असला तरी प्रखर उष्णतामानामुळे नदी-नाले कोरडेठाक होतात. ही बाब लक्षात घेता वनविभागाने जिल्ह्यातील आठ वनपरिक्षेत्रांत वन्यप्राण्यांची तहान भागविण्याकरिता नैसर्गिक आणि कृत्रिम १७३ पाणवठ्यांची निर्मिती केली आहे. याशिवाय प्राण्यांच्या हालचालीवर वॉच ठेवण्याकरिता प्रत्येकी २० ते २२ ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत.दरवर्षी जलसंकट निर्माण होत असले तरी यावेळी जिल्ह्यातील जलसाठ्याची परिस्थिती चांगली आहे. मात्र, उन्हाचा पारा चढत जातो, तसे जंगल परिसरातील नदी-नाले कोरडे होतात. वनविभागाकडून साधारणत: मार्चच्या सुमारास कृत्रिम आणि नैसर्गिक पाणवठ्यांची निर्मिती केली जाते. आठ वनपरिक्षेत्रांत वन्यप्राण्यांकरिता हातपंप, टाके, बशी टाके, नैसर्गिक झरा, तलाव, सौरपंप आदी प्रकारचे पाणवठे असून वन्यप्राण्यांची तहान भागविण्यास उपयोगी ठरत आहेत. कारंजा वनपरिक्षेत्रात २३, तळेगाव २१, आर्वी २४, आष्टी (शहीद) २२, हिंगणी १८, वर्धा १, समुद्रपूर २८, तर खरांगणा वनपरिक्षेत्रात ३६ पाणवठ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक वनपरिक्षेत्रात प्रत्येकी २० ते २२ ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत या माध्यमातून वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसोबतच हालचालींवर वनविभागाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.लिटमस पेपरने होते जलचाचणीउन्हाळ्यात पाण्याच्या शोधार्थ वन्यप्राणी भटकंती करतात. बहुतांशवेळी गावाकडे धाव घेतात. याच दरम्यान जंगल परिसरातील नदी-नाल्यांना कोरड पडत असल्याने वन्यप्राण्यांकरिता कृत्रिम पाणवठे तयार केले जातात. मात्र, शिकाऱ्यांकडून धोका उद्भवू नये म्हणन पाणवठ्यात टाकल्या जाणाऱ्या पाण्याची दर दोन दिवसांनी वनरक्षकाकडून लिटमस पेपरच्या सहाय्याने चाचणी केली जाते. पाण्याचा रंग बदला म्हणजे ते विषारी झायाचे समजून पाणवठ्यातील पाणी बदलविले जाते. कर्मचाऱ्यांकडून सातत्याने गस्त घातली जाते. वनपरिक्षेत्रातील संबंधित अधिकारी, कर्मचाºयांकडून यावर विशेष लक्ष ठेवले जाते.

टॅग्स :forest departmentवनविभागwildlifeवन्यजीव