शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

१६ वर्षांखालील १६०१, १६ ते ३५ वयोगटातील १०१०८ रुग्ण, मात्र, अद्याप कोरोना लसीकरण नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 05:00 IST

गतवर्षीपासून देशभरासह राज्यात  कोरोनाने थैमान घातले आहे.मात्र, वर्धा जिल्हा ९ मे पर्यंत कोरोनामुक्तच असल्याने ग्रीन झोनमध्ये समावेश करण्यात आला होता. यावर्षी मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून लहान मुले, युवकांनाही कोरोनाने डंख मारला आहे. ४५ वर्षांवरील आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. 

ठळक मुद्दे१८ वर्षांवरील सर्वांना मिळेल १ मे पासून लस : १६ वर्षांखालील मुलांना प्रतीक्षाच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या पहिल्या लाटेत १६ वर्षांखालील तसेच १६ ते ३५ वयोगटातील रुग्णांचे प्रमाण नगण्य होते. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाने १६ वर्षांखालील मुले आणि  १६ ते ३५ वयोगटातील नागरिकांनाही कवेत घेतल्याचे चित्र आहे.गतवर्षीपासून देशभरासह राज्यात  कोरोनाने थैमान घातले आहे.मात्र, वर्धा जिल्हा ९ मे पर्यंत कोरोनामुक्तच असल्याने ग्रीन झोनमध्ये समावेश करण्यात आला होता. यावर्षी मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून लहान मुले, युवकांनाही कोरोनाने डंख मारला आहे. ४५ वर्षांवरील आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, १६ वर्षांखालील  मुले आणि १६ ते ३५ वर्षे वयोगटातील रुग्णांना अद्याप लसीकरण नाही.  कोरोनावर मात करण्यासाठी १ मे पासून देशभरात १८ वर्षांवरील सर्वांनाच लस देण्यात येणार आहे. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे. जिल्ह्यात १६ वर्षांखालील १ हजार ६०१ रुग्ण आहेत. १६ ते ३५  वयोगटातील १० हजार १०८ तर १६ ते ४५  वयोगटातील १५ हजार ७९९ रुग्ण आहेत. केंद्र सरकारने १८ वर्षांवरील सर्वांनाच १ मे पासून लस देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या वयोगटातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.मात्र, १६ वर्षांखालील आणि त्यावरील वयोगटातील मुलांना कधी लस दिली जाणार हे अद्याप सांगता येणार नसल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

१६ वर्षांखालील १६०१ रुग्ण; मात्र,लसच उपलब्ध नाही कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना लसीकरण करण्यात आले. कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील तसेच ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणाची प्रक्रिया  सुरू करण्यात आली. अनेकांना पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. १८ वर्षांवरील सर्वांनाच १ मे पासून लस देण्यात येणार आहे. मात्र, १६ वर्षांखालील तसेच त्यावरील वयोगटातील मुलांना लसीकरणाबाबत शासनाकडून नियोजन झालेले नाही.

४५ पेक्षा कमी वयाचे १० हजार १०८ रुग्ण; मात्र, लसीकरण सुरू नाही पहिल्या टप्प्यात आरोग्य, महसूल विभागातील कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांना लसीकरण करण्यात आले.दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण सुरू करण्यात आले असून अद्याप ही प्रक्रिया सुरूच आहे. १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांनाच लस दिली जाणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. त्यामुळे लवकरच ४५ पेक्षा कमी वयोगटातील नागरिकांना लस मिळणार आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस